Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ठाण्यातली 'रेव्ह पार्टी' उधळली, ड्रग्जसहीत एकाला अटक

पोलीस पथकानं सापळा रचून ही कारवाई केली

ठाण्यातली 'रेव्ह पार्टी' उधळली, ड्रग्जसहीत एकाला अटक

ठाणे : दिवाळीमध्ये रेव्ह पार्टीकरता 'इफेड्रीन' हा अंमली पदार्थ ठाण्यातल्या मुंब्रामध्ये घेऊन आलेल्याला ठाणे खंडणीविरोधी पथकानं अटक केली. अवील प्रकाश रॉबर्ट मोंथेरो असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून एक कोटी रुपये किंमतीचं चार किलो इफेड्रीन जप्त केलं गेलं.

मुंब्य्रातल्या कौसा भागात अवील मोंथेरो इफेड्रीन घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस पथकानं सापळा रचून ही कारवाई केली.

दिवाळीमध्ये रेव्ह पार्टी करणाऱ्या तरुण तरुणींसाठी अवीलनं चेन्नईहून मुंब्य्रात हा अंमली पदार्थ आणला गेला होता. त्याला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने २०११ मध्येही अवीलला अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी, मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक केली होती. 

Read More