Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कोल्हापूर येथे डंपर - ट्रक्स अपघात, ४ ठार तर ३ जण गंभीर

कोल्हापूर जिल्ह्यात डंपर आणि  ट्रक्स यांच्यात भीषण अपघात झाला. 

 कोल्हापूर येथे डंपर - ट्रक्स अपघात, ४ ठार तर ३ जण गंभीर

कोल्हापूर : जिल्ह्यातील घोटवडे गावाजवळ डंपर आणि  ट्रक्स यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण जागीच ठार झालेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की, ट्रक्सचा चेंदामेंदा झाला आहे. 

ट्रक्समधून सात जण प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे. हे सगळे गोकुळ शिरगावकडे जात होते. ते पीरळ, शिरोली, तारळे आणि कुडूत्री पिरसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांची ओळख अजून पटलेली नाही. त्यामुळे त्यांची नावे समजू शकलेली नाहीत.

fallbacks

Read More