वसई विरार महापालिका माजी आयुक्त अनिल कुमार पवारांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार त्यांची चौकशी सुरु आहे विशेष म्हणजे अनिल कुमार पवारांसोबत त्यांच्या पत्नीचीही चौकशी करण्यात येते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या राहत्या घडी धाड टाकली होती. तब्बल 18 तास ईडीचा तपास सुरु होता. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) 2002 अंतर्गत मुंबई, पुणे, नाशिक आणि साता-यातल्या 12 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते