Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आली थंडी, महागली अंडी

Egg price increase :राज्यात शहरातील तापमानात घट झाल्याने चिकन आणि अंड्यांचा खप वाढू लागला आहे.  

आली थंडी, महागली अंडी

मुंबई : Egg price increase :राज्यात शहरातील तापमानात घट झाल्याने चिकन आणि अंड्यांचा खप वाढू लागला आहे. थंडी सुरू होताच अंड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे अंड्यांचे भाव कडाडले आहेत. आता 100 अंड्यांसाठी 650 रूपये मोजावे लागणार आहेत.

ऐन थंडीमध्ये अंडी महागली आहेत. नोव्हेंबर महिन्यात कमी झालेली मागणी डिसेंबर महिन्यात वाढली. घाऊक बाजारात 100 अंड्यांसाठी 500 रूपये तर, किरकोळ बाजारात 650 रूपये मोजावे लागणार आहे. अंडी महाग झाल्याने सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार आहे. 

राज्यात तापमानात घट झाल्याने चिकन आणि अंड्यांचा खप वाढू लागला आहे. या परिणाम हा अंड्याच्या दरवाढीवर दिसून येत आहे.  हिवाळ्यात आमची विक्री झपाट्याने वाढते कारण लोक या काळात मांसाहाराला प्राधान्य देतात. त्यामुळे अंड्याला मागणी वाढली आहे. ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दरात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

गतवर्षी कोविडचा उद्रेक झाल्यानंतर आणि या जानेवारीत बर्डफ्लूचा धोका वाढल्यानंतर चिकनचे दर आणि अंड्यांच्या किमतीत घसरण झाली होती. आता पुन्हा मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे.

Read More