Eknath Khadse on Pranjal Khewalkar : एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा पाय आणखी खोलात शिरत चालला आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये अनेक अश्लिल व्हिडीओ आणि फोटो सापडल्याने खेवलकरच्या अडचणीत वाढ झाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी खळबळ उडवन देणारी माहितीच सार्वजनिक केली आहे. त्यामुळे आता या हे प्रकरण अतिशय गंभीर झालं आहे. खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये तब्बल 1749 व्हिडीओ आणि फोटो सापडले आहेत. त्यात 234 अश्लील फोटो असून तर 19 अत्यंत अश्लील व्हिडीओ आहेत.
खेवलकरच्या मोबाईलमध्ये मोलकरणींचे अत्यंत वाईट अवस्थेतले व्हिडीओ असल्याचेही चाकणकर यांनी सांगितलं आहे. मुलींचे विवस्त्र व्हिडीओ, नशा आणि लैंगिक अत्याचाराच्या क्लिप्स एकनाथ खडसे यांचे जावयी प्रांजल खेवलकरच्या मोबाईल सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. हे प्रकरण मानवी तस्करीच असल्याचा मोठा आरोप चाकणकर यांनी केला आहे. त्यानंतर झी 24 तासाने एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी रुपाली चाकणकरांवर पलटवार केला आहे. (Eknath Khadse first reaction after allegations against son in law Pranjal Khewalkar Rupali Chakankar)
एकनाथ खडसे म्हणालेत की, 'पोलिसांनी अशी कुठलही माहिती आम्हाला दिलेली नाही. रुपाली चाकरणकर यांच्याकडे कुठले पुरावे आहेत का? त्यांनी स्वत: काही पाहिलं आहे का? जर पुरावे असतील तर त्यांनी ते दाखवले पाहिजे होते. आम्ही काय कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. तसंच आम्ही चुकीच्या गोष्टीला समर्थन देते नाही. रुपाली चाकणकर यांना यात एवढा रस का? महिला आयोगाच्या अध्यक्षा असल्याने त्यांच्याकडे अनेक कामं आहेत ना त्यांना...या प्रकरणात वारंवार हस्तक्षेप करणे राजकीयदृष्ट्या करण्यासारखं आहे. '
'तरी मी सांगतो पोलिसांनी आम्ही यासंदर्भात माहिती दिलेली नाही. 200 असो किंवा 500 असो मी समर्थन करणार नाही. मुळात मी असं म्हणेल तुम्ही काही पाहिलं नाही, पुरावे दिले नाहीत, ही अफवा आहे. हे बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.