Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुण्यातील रेव्ह पार्टीतून जावई अटकेत, एकनाथ खडसेंनी उपस्थित केले प्रश्न!

Eknath Khadse: पुण्यातील रेव्ह पार्टीवरून एकनाथ खडसेंनी काही सवाल उपस्थित केले आहेत.

पुण्यातील रेव्ह पार्टीतून जावई अटकेत, एकनाथ खडसेंनी उपस्थित केले प्रश्न!

Eknath Khadse: पुण्यातील रेव्ह पार्टीवरून एकनाथ खडसेंनी काही सवाल उपस्थित केले आहेत. तसंच पोलिसांच्या भूमिकेवर देखील एकनाथ खडसेंनी प्रश्न उपस्थित केलेत. मात्र, एकनाथ खडसेंचे सर्व आरोप पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी फेटाळून लावले आहेत. कायदेशीर कारवाई केल्याचं स्पष्टीकरण अमितेश कुमार यांनी दिलंय.

काय आहे नेमकं प्रकरण?

एकनाथ खडसेचे जावई प्रांजल खेवलकरला रेव्ह पार्टीतून अटक केल्यानंतर खडसेंनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलाय. प्रांजल खेवलकरांकडे अंमली पदार्थ आढळून आला नाही तरीही त्यांना पहिल्या क्रमांकाचा आरोपी केल्याचा दावा खडसेंनी केलाय. या कारवाईच्या माध्यमातून कुटुंबाच्या बदनामीचा कट रचला जातोय असा आरोप देखील खडसेंकडून करण्यात आलाय. मात्र खडसेंचा आरोप पुण्याचे सीपी अमितेश कुमारांनी फेटाळलाय.

'अधिकार पोलिसांनी कोणी दिला?'

वैयक्तिक आयुष्यातील फोटो शेअर करण्याचा अधिकार पोलिसांनी कोणी दिला? असा सवाल देखील एकनाथ खडसेंकडून उपस्थित करण्यात आला होता. मोबाईल आणि लॅपटॉप देखील जप्त केल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला. तर पोलिसांनी कोणतेही फोटो शेअर केला नसल्याचं स्पष्टीकरण अमितेश कुमार यांच्याकडून देण्यात आलं.

 खडसेंना काय संशय?

अल्कहोलचा रिपोर्ट बाहेर आला मात्र, ड्रग्जचा रिपोर्ट अद्याप का दिला नाही? असा प्रश्नही एकनाथ खडसेंकडून उपस्थित करण्यात आलाय. ड्रग्जच्या रिपोर्टसंदर्भात छेडछाड होऊ शकते असा संशय देखील एकनाथ खडसेंकडून व्यक्त करण्यात आला. ड्रग्जच्या रिपोर्टबाबत छेडछाड होऊ शकते,असा खडसेंना संशय आहे. 

'सरकार का बोलत नाही?'

हनी ट्रॅपच्या सीडीवरून सरकार का बोलत नाही. असा सवाल देखील एकनाथ खडसेंनी उपस्थित केला. लोढाकडची सीडी बघितली असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी एकनाथ खडसेंनी केलीय.लोढाकडची सीडी मी बघितली आहे त्यावर सरकार का बोलत नाही? असा प्रश्न एकनाथ खडसेंनी विचारला. 

अहवाल कधी येणार?

एकनाथ खडसेंचे जावई रेव्ह पार्टी प्रकरणात अटकेत आहेत. प्राजंल खेवलकरांनी अल्कहोल सेवन केल्याचं अहवालातून समोर आलंय. मात्र, अंमली पदार्थाचा अहवाल दोन दिवसात समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अहवालातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read More