Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सोंगड्याची उपमा देणाऱ्या विनायक राऊतांवर शहाजीबापू पाटलांचा पलटवार

माझी भाषणं ऐकण्यासाठी राऊत यांनी कानातला मळ काढून ठेवावा, असेही शहाजीबापू यांनी म्हटलं आहे

सोंगड्याची उपमा देणाऱ्या विनायक राऊतांवर शहाजीबापू पाटलांचा पलटवार

सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : शिंदे गटातील 50 आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील सत्तातरानंतर राजकारण तापलं आहे.  आता राज्यात एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) याचं सरकार आलं आहे. 

मात्र यानंतरही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे आणि इतर शिवसेना नेत्यांनीही शिंदे गटातील आमदारांवर टीका करणे सुरुच ठेवले आहे. आदित्य ठाकरे शिव संवाद यात्रेद्वारे शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधत आहेत. तर खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) हेही जोरदार टीका करत आहेत.
 
सांगोला येथे  शिवसेनेचा आज निर्धार मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी स्थानिक आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्यावर जोरदार टीका केली  सध्या महाराष्ट्रात काळू बाळू यांचा तमाशा सुरू आहे असं म्हणत आमदार शहाजीबापू पाटील यांना सोंगाड्याची उपमा दिली.

त्यानंतर आता शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आज सांगोला येथे उरल्या सुरल्या शिवसैनिकांत खासदार राऊत यांनी सभा घेतली. पन्नास साठ टुकार पोरावर सभा घेण्याची वेळ आली, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली.

तर, "मला सोंगाड्या म्हणणाऱ्या राऊत यांनी मागच्या सरकार मध्ये काय नाच्या म्हणून काम केले का? पावसाळा संपला की कोकणात सात तालुक्यात जाऊन सभा घेणार आहे. सडतोड उत्तर दिले जाईल. माझी भाषणं ऐकण्यासाठी राऊत यांनी कानातला मळ काढून ठेवावा," असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.

Read More