Eknath Shinde meets PM Modi: महाराष्ट्राचे राजकारण धक्कादायक वळणावर आले आहे. एका आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी दुस-यांदा दिल्ली दौरा केला आहे. दरम्यान शिंदेंच्या या दिल्ली वारीवरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मागील काही दिवसांपासून महायुतीमध्ये आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महायुतीमधील सुप्त संघर्षावर एकनाथ शिंदेंनी अमित शाहांसोबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक तास बंद दाराआड चर्चा झाली.
महायुतीतले वाद सोडवण्यासाठी लक्ष घाला असं साकडं एकनाथ शिंदेंनी अमित शाहांना घातल्याचं सांगण्यात येतंय. एकनाथ शिंदेंनी काल रात्री तातडीनं दिल्ली गाठली. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास शिंदेंनी अमित शाहांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महायुतीतल्या वादांवर लक्ष घालण्याची विनंती केल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघातील विरोधकांना राष्ट्रवादी आणि भाजपात प्रवेश दिला जात आहे. एकनाथ शिंदेंचे आणि शिवसेनेचे प्रकल्प थंडबस्त्यात टाकले जातायेत. संजय शिरसाटांसारख्या नेत्यांना पाठवण्यात आलेल्या आयकरच्या नोटीसांसंदर्भात या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंनी आठवडाभरात दोनदा दिल्लीवारी केल्यानं महाराष्ट्रात चर्चा आहेत.
महायुतीतील अडचणीसंदर्भात एकनाथ शिंदे आणि अमित शाहांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. महायुतीतल्या वादावर लक्ष घाला असं साकडं एकनाथ शिंदेंचे अमित शाहांना घातल्याचे सूत्रांची माहिती आहे. महायुतीमधील निधीचा वाद, पालकमंत्रिपदावरुन सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्याची विनंती केल्याची माहिती समोर येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नेते चांगलेच वादात सापडले आहेत त्यामुळे विरोधकांकडून एकनाथ शिंदेंची देखील चांगलीच कोंडी करण्यात आली होती. तसंच महायुतीमध्ये देखील एकनाथ शिंदेंची कोंडी होत असल्याची चर्चा आहे. दरम्यान याच सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी काही महत्त्वाचे विषय अमित शाहांसमोर मांडले आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौ-यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. महाराष्ट्राच्या महान परंपरेला सत्ताधा-यांनी ग्रहण लावल्याचा हल्लाबोल राऊतांनी केलाय. तर ठाकरे देखील दिल्लीत गेले आहेत. त्याला तुम्ही काय म्हणणार असा सवाल दादा भुसेंनी राऊतांना केला.