Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मंत्र्याचा बेडरुमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय; काही मंत्र्यांना घरी जावं लागलं म्हणत डायरेक्ट वार्निंग दिली...

संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगसंबंधीचा बेडरुममधला व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज दिली. यानंतर आता उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी देखील समज देत डायरेक्ट वॉर्निंग दिली आहे.  

  मंत्र्याचा बेडरुमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय; काही मंत्र्यांना घरी जावं लागलं म्हणत डायरेक्ट वार्निंग दिली...

Eknath Shinde On Controversial Ministers : संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगसंबंधीचा बेडरुममधला व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज दिली. यानंतर आता उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी देखील समज देत डायरेक्ट वॉर्निंग दिली आहे.  

एकनाथ शिंदे यांनी  शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांच्या कानपिचक्या घेतल्या आहेत.  एकनाथ शिंदे यांनी वादग्रस्त मंत्री आणि आमदारां अप्रत्यक्ष  इशारा दिला आहे.  तुमच्याकडे दाखवलेल बोट हे माझ्याकडे असतं. बदनामी मुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलं. असा अप्रत्यक्ष इशारा एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना दिला.  माझ्या परिवारावर कारवाई करायला मला अजिबात आवडणार नाही. परंतु मला कारवाई करायला भाग पडणार नाही तसंच तुमच्याकडून काम अपेक्षित आहे. 

एकनाथ शिंदेंनी सर्व मंत्री आणि आमदारांना समज दिली आहे. गेल्या काही दिवसांत काही गोष्टी घडल्या. तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं.  तुमचे आमदार काय करतात असा प्रश्न मला विचारला जातो.   तुम्ही सगळी माझी माणसं आहात. आपलं कुटुंब एक आहे.  तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे . चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवू नका. कमी बोला जास्त काम करा अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या. 

मी रागावत नाही. मी प्रमुखासारखं वागत नाही. कार्यकर्त्यासारखं वागतो. तुम्हीही तसंच वागा. आपल्या डोक्यात हवा जाऊ देता कामा नये.  कितीही पदं मिळाली तरी कार्यकर्ता आहे असंच समजून कामं करा .  कमी वेळात जास्त यश मिळालंय. लोकं आपल्या पाठीशी आहे . त्यामुळे बदनामीचा डाव रचले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या.  यापुढील काळ कसोटीचा आहे. सामाजिक जीवनात पथ्य पाळावी लागतात. ती काळजी घ्या याचे पालन कटाक्षाने करा अशा शद्बात एकनाथ शिंदे यांनी शिवसनेचे सर्व मंत्री आणि आमदारांना समज दिली .

Read More