Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर', पालिका निवडणुकीआधी कोणाला धक्का?

Eknath Shinde Operation Tiger: एकनाथ शिंदेंचं काम आणि त्यांची निर्णय घेण्याची क्षमता पाहून पक्षात इनकमिंग सुरू असल्याचं विधान खासदार रवींद्र वायकर यांनी केलंय.

महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर', पालिका निवडणुकीआधी कोणाला धक्का?

Eknath Shinde Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर'च्या माध्यमातून शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू होणारय. सोमवारी शिंदेंच्या शिवसेनेत अनेक नेत्यांचा प्रवेश होणार असल्याचं मोठं विधान संजय शिरसाट यांनी केलंय. दरम्यान शिरसाटांच्या दाव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून निशाणा साधण्यात आलाय.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवण्यात येणारय. आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पक्षातील इनकमिंग भर दिला जातोय. येणा-या काही दिवसात शिवसेनेत दिग्गज नेत्यांचा प्रवेश होणार असल्याचं विधान संजय शिरसाट यांनी केलंय.. तर शिंदेंचे खासदार भाजप आणि अजित पवारांकडे जाणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय.

एकनाथ शिंदेंचं काम आणि त्यांची निर्णय घेण्याची क्षमता पाहून पक्षात इनकमिंग सुरू असल्याचं विधान खासदार रवींद्र वायकर यांनी केलंय. मात्र, एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर या फक्त अफवा असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय. तसंच दिल्लीत एकनाथ शिदेंना कोणतंही महत्व उरलं नसल्याची टीका देखील दानवेंनी केलीय.

विधानसभेनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरला सुरूवात करण्यात आली होती.. त्यानंतर ठाकरेंना मोठा धक्का देत राजन साळवींनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. फक्त राजन साळवीच नव्हे तर ठाकरेंच्या अनेक नेत्यांनी शिवबंधन तोडत धनुष्यबाण हाती घेतलाय.. मात्र, इथवरच न थांबता शिंदेंची शिवसेना ठाकरेंना आणखीन मोठे धक्के देण्याच्या तयारीत आहे.

5 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? 

पक्षात सुरु असलेली आऊट गोईंग थांबवण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.  पक्षांतर बंदीच्या कायद्याचा फटका बसू नये म्हणून शिंदे यांच्या पक्षाला आणखी एका खासदाराची गरज आहे. एक खासदारांशी देखील संपर्क सुरू आहे.  दरम्यान यापूर्वी देखील शिवसेना UBTचे 6 खासदार संपर्कात असून लवकरच मोठे प्रवेश होणार असल्याचा दावा उदय सामंतांनी केला होता. सुधाकर बडगुजर भाजपात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच... सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलीय. पक्षाविरोधी कृतीमुळे सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय.. मंगळवारी बडगुजर यांनी पक्षाविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तसंच पक्षात आठ ते दहा जण नाराज असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलं होतं. दरम्यान त्यांच्या याच वक्तव्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवलाय. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्ध्वस्त नाही केलं तर नाव सांगणार नाही अशी शपथच आता शिवसेनेचे माजी आमदार रामदास कदमांनी घेतलीये. दोपाली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेनं ऑपरेशन टायगर फत्ते केलंय. ठाकरेंच्या 9 नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडली. या पक्षप्रवेशादरम्यान रामदास कदमांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय. तर रामदास कदम यांना पुन्हा मातोश्रीच्या दारात यावंच लागणार, असा दावाच राऊतांनी केलाय.

Read More