Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'चिंता करु नको, तुझ्या पाठीमागे एकनाथ शिंदे उभा आहे', योगेश कदमांचा उल्लेख करत राऊत म्हणाले 'तुमचा बाप...'

योगेश कदमांवरील आरोप मॅनेज असल्याचा आरोप रामदास कदमांनी केला आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं योगेश कदमांविरोधातील पुरावे राज्यपालांकडे दिले आहेत  

'चिंता करु नको, तुझ्या पाठीमागे एकनाथ शिंदे उभा आहे', योगेश कदमांचा उल्लेख करत राऊत म्हणाले 'तुमचा बाप...'

मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंचे मंत्री चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कांदिवलीमधील डान्स बारवरून गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं आरोप केला आहे. दरम्यान यावरून रामदास कदमांनी एक मोठं विधान केलं आहे. परिषदेतील योगेश कदमांवरील आरोप मॅनेज असल्याचा आरोप रामदास कदमांनी केला आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं योगेश कदमांविरोधातील पुरावे राज्यपालांकडे दिले आहेत

ठाकरेंची शिवसेना महायुतीमधील वादग्रस्त मंत्र्यांविरोधात आक्रमक झाली आहे. वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यपालांकडे केली आहे. अधिवेशनात आमदार अनिल परबांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर गंभीर आरोप केले होते. कांदिवलीमधील एका बारवरून परबांनी योगेश कदमांनी कोंडीत पकडलं होतं. दरम्यान परबांनी योगेश कदमांवर जे आरोप केले होतं. त्यासंदर्भातले पुरावे त्यांनी राज्यपालांना दिले आहेत. त्यामुळे योगेश कदमांची अडचण चांगलीच वाढण्याची शक्यता आहे...

गृहराज्यमंत्री अनधिकृत डान्स बार चालवतात, पोलीस प्रशासन झोपलंय का? अशी विचारणा अंबादास दानवे यांनी केली आहे.  ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांवर गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी भाष्य केलं आहे. विरोधकांच्या आरोपांना योग्य उत्तर
दिल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. तर चिंता करण्याची गरज नाही तुझ्या पाठीमागे शिवसेना आणि एकनाथ शिंदे उभा आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी योगेश कदमांना धीर दिला.

एकनाथ शिंदेंनी कदमांच्या पाठिशी केलेल्या विधानानंतर संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना खोचक टोला लगावला आहे. मी पाठीशी म्हणजे काय? असा सवाल राऊतांनी केला.. तसंच तुमचा बाप दिल्लीत बसल्याचं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.

शिवसेनेच्या मंत्र्यांवर होत असलेल्या आरोपांवरून रामदास कदमांनी अप्रत्यक्षरित्या सरकारकडे बोट दाखवलंय. सभापतींना आधी पुरावे द्यावे लागतात. तसंच सभापतीच्या संमतीशिवाय आरोप करता येत नाही. त्यामुळे हे मॅनेज कसं झालं असा सवाल
रामदास कदमांनी उपस्थित केला आहे.

सभापतीच्या संमतीशिवाय आरोप करता येतच नाही. रागामध्ये रामदास कदम हे ब-याच गोष्टी बोलत असतात असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 

 

कांदिवली येथे सावली बारमध्ये पोलिसांनी धाड टाकली होती

या धाडीत 22 बारबाला 22 कस्टमर आणि 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आलं होतं. 

पोलिसांनी पंचनामा केला असता त्या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांनी केला होता

 

शिंदेंच्या मंत्र्यांमागे लागलेल्या शुक्लकाष्टाबाबत रोहित पवारांनी टू द पॉईंट मुलाखतीमध्ये भाष्य केलं होतं. एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना आयकर विभागाची नोटीस पाठवण्यात आल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. एवढंच नव्हे तर भाजपकडून एकनाथ शिंदेंची शिवसेना
आणि दादांच्या राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचं काम सुरू असल्याचा आरोप देखील रोहित पवारांनी केला आहे. 

एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांवर मागील काही दिवसांपासून आरोपांची राळ उठली आहे. त्यात आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांना भेटत कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदेंच्या मंत्र्यांमागे लागलेलं राजकीय आरोपांचं ग्रहण लवकर सुटणार नसल्याचीच चिन्ह आहेत.

Read More