Eknath Shinde Shivsena Reaction: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज वरळीतील एनएससीआय डोम येथे आयोजित 'मराठी विजय मेळाव्या'त एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. मराठी भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या या बंधूंनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला. या ऐतिहासिक क्षणाला साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठीप्रेमी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून यावर पहिली प्रतिक्रिया आली आहे. ही प्रतिक्रिया देताना शिवसेनेकडून राज ठाकरेंची पाठराखण तर उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आलीय.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारवर टीका केली. यानंतर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली. तसेच शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. शिवसेनेचे नेते प्रतिक्रिया देत असताना त्यांच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट करण्यात आली. ज्यामध्ये राज ठाकरेंना उजवं माप देण्यात आला तर उद्धव ठाकरेंना डिवचण्यात आलयं. 9 विरोधाभास दाखवणारी वाक्य शेअर करण्यात आली असून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील फरक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
एक प्रबोधक, दुसरा प्रक्षोभक
— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) July 5, 2025
एक उजवा, दुसरा डावा
एक धाकला असून थोरला
दुसरा थोरला असून धाकला
एक मराठी प्रेमी, दुसरा खुर्चीप्रेमी
एकाच्या मुखी आसूड, दुसऱ्याच्या तोंडी सूड!
एक मराठीचा पुरस्कर्ता, दुसरा तिरस्कर्ता
एक प्रगल्भ, दुसरा वेडापिसा
एकाचा मराठीचा वसा
दुसऱा भरतोय खिसा
एकाचा…
एक प्रबोधक, दुसरा प्रक्षोभक
एक उजवा, दुसरा डावा
एक धाकला असून थोरला
दुसरा थोरला असून धाकला
एक मराठी प्रेमी, दुसरा खुर्चीप्रेमी
एकाच्या मुखी आसूड, दुसऱ्याच्या तोंडी सूड!
एक मराठीचा पुरस्कर्ता, दुसरा तिरस्कर्ता
एक प्रगल्भ, दुसरा वेडापिसा
एकाचा मराठीचा वसा
दुसऱा भरतोय खिसा
एकाचा स्वतंत्र सवतासुभा
दुसरा नुसताच आयतोबा!
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मराठी विजय मेळाव्यानंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी भाजपकडून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंमध्ये शरद पवार यांचीच आयडिओलाॅजी त्यांच्याच भिनली आहे आहे. राजकीय पेरणी करण्याचा प्रयत्न या इव्हेंट मधून झाला. तर भाजप आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाविषयी मळमळ आणि गरळ ओकण्याचे काम सध्या सुरु आहे. दोघांच्या भाषणात महिमामंडन सुरू आहे. देवेंद्रजी महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे लोकं फळं येणाऱ्या झाडावरच दगड मारत असतात. त्यामुळे आता आपलं कसं होणार? हेच आजच्या इव्हेंटवरुन दिसतंय.'पुढे दरेकर म्हणाले की, दोन्ही नेत्यांची भाषणं ऐकली राज ठाकरे मराठीचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करत होते, स्पष्टीकरण देत होते, एकत्र येण्यासाठी आवाहन करत होते. मात्र सत्ता गेल्याचे वैषम्य उद्धव ठाकरेंच्या भाषणात दिसत होतं. राजकीय पेरणी करण्याचा प्रयत्न या इव्हेंटमधून झाला. झेंडे आणायचे की नाही, वर कोण बसायचं यावरुन सगळे कन्फ्यूज होते. राजकारणाचा दर्प या मेळाव्यात दिसत होता. उद्धव ठाकरेंमध्ये शरद पवार यांचीच आयडिओलाॅजी भिनली आहे, अशी टीका ही दरेकर यांनी यावेळी केली. मुंबई महापालिकेत कोण कंत्राटदार मोठे केलेत आणि किती मराठी होते? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना किती मराठी माणसाचे हित जपले? सरकार मराठी माणसांच्या हितासाठी आपल्याला समर्थन देईल, यात दुमत नक्कीच नाही. भाजपनं सुद्धा मराठी माणसासाठी भूमिका घेतली आहे. अभिजात दर्जा देखील फडणवीस साहेबांच्या प्रयत्नाने मिळाला आहे. मराठी भाषा भवन तुमच्या काळात उभं राहू शकलं नाही हे देखील सत्य आहे असेही भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले.