कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठात असणा-या महादेवी हत्तीणीचं गुजरातमध्ये स्थलांतर करण्यास नागिरकांनी विरोध केला. या हत्तीणीचं वनतारा हत्ती केंद्रात पाठवण्याचे आदेश मुंबई हाकोर्टानं दिले. त्यामुळे गावात संतापाची लाट उसळली. या आदेशानंतर काल रात्री वनताराचे पथक गावात आल्याची माहिती मिळाल्यानंतर अख्ख गाव रस्त्यावर उतरलं. दरम्यान आज गावातील हत्ती बचाव कृती समितीच्या वतीने मूक मोर्चा काढला जाणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या निर्णया विरोधात नांदणी मठानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. स्वस्ति श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात ही हत्तीण अनेक वर्षांपासून सांभाळली जाते. इतकंच नव्हे तर या मठाला कित्येक वर्षाची परंपरा आहे, असं असताना महादेवी हत्तीणीला वनताराला पाठवण्याचा घाट का घातला जातोय असा संतप्त सवाल कोल्हापूरकर विचारत आहेत.