Yashashri Munde : भाजपचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्याही राजकारणाच्या मैदानात उतरली आहे. पंकजा, प्रीतमपाठोपाठ आता यशश्री मुंडेंनी राजकारणात एन्ट्री केली आहे. परळीतील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसाठी त्यांनी उमदेवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय पदार्पणाची जोरदार चर्चा रंगली आहे. सहकार क्षेत्रातून यशश्री यांचे राजकारणातील हे पहिले पाऊल मानलं जात आहे.
वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीनिमित्त पहिल्यांदाच यशश्री मुंडे निवडणुकीच्या रिंगणात पहायला मिळतील. 14 जुलैला उमेदवारी अर्जांची छाननी आणि 15 ते 19 जुलैदरम्यान अर्ज मागे घेण्याचा कालावधी असून यानंतरच याचे चित्र स्पष्ट होणार आहे. एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होत असून 10 ऑगस्टला मतदान तर 12 रोजी मतमोजणी होणार आहे.. या निवडणुकीनिमित्त दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या तिस-या मुलीचे लॉन्चिंग होत आहे.
वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी यशश्रीसह माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि इतरांनी मिळून 71 अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत या बँकेच्या संचालक मंडळावर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल बिनविरोध निवडून आले आहे. त्यामुळे यंदाही यशश्री यांच्या नेतृत्वाखालील पॅनल बिनविरोध निवडले जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. असं झालं तर यशश्री मुंडे यांची राजकारणातील ही यशस्वी एन्ट्री मानली जाईल.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची तृतीय कन्या
यशश्री या पेशाने वकील आहेत
अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून उच्च शिक्षण
कॉर्नेल विद्यापीठाकडून 'प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट' म्हणून गौरव
पंकजा आणि प्रीतम यांचं शिक्षण मराठी माध्यमातून
यशश्री यांचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालंय
इतकी वर्षे त्या राजकारणापासून काहीशा दूर होत्या
--मात्र आता वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीसाठी अर्ज भरलाय