Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'ऐक राज ठाकरे, मी यूपीचा..महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं', 26/11 हल्ल्यावेळी लढलेल्या Ex कमांडोंने विचारले प्रश्न!

Raj Thackeray: 26/11 च्या मुंबई हल्ल्यात कर्तव्य बजावेल्या एक्स मरीन कमांडो प्रवीण कुमार तेवतिया यांनी राज ठाकरेंना प्रश्न विचारला आहे. 

'ऐक राज ठाकरे, मी यूपीचा..महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं', 26/11 हल्ल्यावेळी लढलेल्या Ex कमांडोंने विचारले प्रश्न!

Raj Thackeray: महाराष्ट्रात सध्या भाषेवरून गोंधळ सुरू आहे. मराठी आणि हिंदी घोषणांच्या दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एका रॅलीत मराठी अस्मितेचा नारा दिला. मराठी बोलणार नाही, असा माज करणाऱ्यांना धडा शिकवा असे आवाहन राज ठाकरेंनी केले. व्यावसायिक सुशील केडियाने राज ठाकरेंना आव्हान दिले आणि त्यानंतर माफी मागितली. यानंतर  मी मुंबईत येऊन त्यांचा सर्व अहंकार बाहेर काढेन!, असे आव्हान पूर्णियाचे खासदार राजेश रंजन उर्फ ​​पप्पू यादव यांनी दिलंय. आता एका सैनिकाने राज ठाकरेंना काही प्रश्न विचारलेयत.   

26/11 च्या मुंबई हल्ल्यात कर्तव्य बजावेल्या एक्स मरीन कमांडो प्रवीण कुमार तेवतिया यांनी राज ठाकरेंना प्रश्न विचारला आहे. त्यांनी एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, 'मी उत्तर प्रदेशचा आहे. पण जेव्हा मुंबईवर हल्ला झाला तेव्हा मी माझा जीव धोक्यात घालून महाराष्ट्रासाठी रक्त सांडले. त्यावेळी तुमचे योद्धे कुठे होते?'

ताज हॉटेलमध्ये 150 लोकांचे प्राण वाचवले

प्रवीण तेवतिया यांनी सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ते गणवेशात दिसत आहेत. त्यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटवर उत्तर प्रदेश लिहिले आहे. त्यांच्या गळ्यात बंदूक लटकलेली आहे. मी ताज हॉटेलमध्ये 150 लोकांचे प्राण वाचवले. त्यावेळी भाषा मध्ये आली नव्हती, राज्य नव्हते. फक्त देश आणि मानवता होती. म्हणून भाषेच्या नावाखाली देशाचे विभाजन करू नका. हास्याची कोणती भाषा नसते, असे प्रवीण म्हणाले. 

तेवतिया मार्कोस कमांडो

माध्यमांतील वृत्तानुसार, तेवतिया हे मार्कोस कमांडो होते आणि 26/11 च्या हल्ल्यात त्यांनी त्यांच्या टीमचे नेतृत्व केले. ताज हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्याच्या ऑपरेशनमध्ये त्यांना 4 गोळ्यांचा सामना करावा लागला आणि तरीही ते खंबीर राहिले. त्यांच्या शौर्यामुळे 150 हून अधिक लोकांचे प्राण वाचले. भाषेच्या नावावरुन वाद सुरू असताना त्यांनी आपला मुद्दा मांडला आणि राज ठाकरे यांना प्रश्न विचारला.महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी संक्ती करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी विजयी मेळावा घेतला. 

नितेश राणेंची टीका 

मराठी न बोलल्याबद्दल एका हिंदू व्यक्तीला मारहाण केल्याचे म्हणत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी मनसेवर टीका केली. 'टोपी घातलेले' लोक मराठी चांगले बोलतात का? असा प्रश्नही उपस्थित केला. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी मुंबईच्या बाहेरील भाईंदरमध्ये मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलच तापलंय. 

केडियांचे आव्हान, माफी आणि आणखी एक ट्वीट!

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या मीरा रोड येथील दुकानदाराला मनसैनिकांनी चोप दिला. यानंतर सुशील केडिया यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, "राज ठाकरे याची नोंद घ्या की, मागील 30 वर्षांपासून मुंबईत राहत असूनही मला मराठी नीट येत नाही. आता तुमच्या अती गैरवर्तनामुळे मी निश्चित केलं आहे की, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत आहे तोपर्यंत मराठी शिकणार नाही अशी मी प्रतिज्ञा करतो. काय करायचं आहे बोल?". असे म्हणत राज ठाकरेंना आव्हान दिले. यानंतर त्यांनी राज ठाकरेंची माफी मागितली. दरम्यान त्यांनी आणखी एक ट्विट करत देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय. जोपर्यंत महाराष्ट्राचे प्रशासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाती आहे. तोपर्यंत निश्चिंत राहा. कोणावरही कोणत्याही प्रकारचा अत्याचार सहन केला जाणार नाही. न्याय व्यवस्था संपूर्ण सक्रीय राहील. विश्वास हाच प्रेमाचा आधार आहे. प्रेम न्यायाचा आणि न्याय धर्माचा आधार आहे. जय महाराष्ट्र, जय भारत! असे सुशील केडीयांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.

Read More