Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Exclusive : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; राज ठाकरे- उद्धव ठाकरे युतीबाबत संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट, 'दोघा भावांनी याबद्दल...'

Exclusive Sanjay Raut : राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत संजय राऊत यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या मुलाखत गौप्यस्फोट केला आहे. 

Exclusive : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; राज ठाकरे- उद्धव ठाकरे युतीबाबत संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट, 'दोघा भावांनी याबद्दल...'

Sanjay Raut on Raj Thackeray - Uddhav Thackeray Alliance :  गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार की नाही याबद्दल राज्यात चर्चा सुरु आहे. यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे- उद्धव ठाकरे युतीबाबत संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी मुलाखत झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतली. ज्यात संजय राऊत यांनी राजकारणातील अनेक गुप्त सांगत गौप्यस्फोट केलेत. ठाकरे बंधूंच्या युतीचे शिल्पकार संजय राऊत यांनी ठाकरे बंधु युतीबद्दल गुप्त उघड केले आहेत. मराठी माणसानं पाहावीच अशी रोखठोक मुलाखत आज रात्री 8.53 मिनिटांनी झी २४ तासवर तुम्ही पाहू शकणार आहात. 

राज ठाकरे- उद्धव ठाकरे युतीवर मोठे गौप्यस्फोट

संजय राऊत म्हणाले की, 5 जुलैला मोर्चात ठाकरे बंधु 100 टक्के एकत्र दिसणार. मीडियाच्या भाषेत राज ठाकरे - उद्धव ठाकरे एका फ्रेममध्ये दिसणार आहे. दोन बंधुसाठी आमचा मोर्चा रद्द करुन त्यांनी त्यांची तारीख बदलून हा मोर्चा काढला नसता. 

हिंदीच्या विरोधात ठाकरे बंधू मैदानात

5 जुलैला दोन बंधू एकत्र येणार असल्याचं विधान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी टू द पॉईंट या मुलाखतीत केलंय. दोन भावांनी एकत्र यावं, एकत्र ताकद दिसावी म्हणून एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याचंही संजय राऊतांनी म्हटलंय. आमच्या शिवसेनेचा 7 जुलैला मोर्चा होता, आणि राज ठाकरेंनी आधी 6 जुलैला मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र, दोन्ही पक्ष एकत्र यायला हवेत म्हणून आम्ही मोर्चाची तारीख 5 जुलै केल्याचंही संजय राऊतांनी म्हटलंय..

'दोघा भावांनी याबद्दल...'

टू द पॉईंट मुलाखतीमधून संजय राऊतांनी आणखीन एक मोठं विधान केलंय. युतीबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संवाद झाल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. तसंच एकत्र यायचंय ही ठाकरे बंधूंची मानसिकता असल्यांचही राऊत म्हणालेत. राजकारणात थोडेफार मतभेद होत असतात मात्र,दोन्ही बंधूंमधील कटूता आता दूर झाल्याचंही राऊतांनी सांगितलं.

'उद्धव ठाकरे-राज ठाकरे सुपर पॉवर'

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये मोर्चाआधी थेट चर्चा होणार असल्याचा दावा देखील टू द पॉईंटमध्ये संजय राऊतांनी केलाय. 5 जुलैला ठाकरे बंधूंची महाशक्ती दिसणार तसंच राज आणि उद्धव ठाकरेंना एकत्र येण्यापासून कोणीही रोखू शकणार नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. तसंच पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय राज्य सरकारला मागे घ्यावा लागणार, असा दावा देखील संजय राऊतांनी केलाय.

Read More