Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

1100 कोटींची जमीन आणि 405 कोटींचा बंगला! महाराष्ट्रात झाला भारतातील सर्वात मोठा व्यवहार

2024 या वर्षात भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रात मोठे व्यवहार झाले. 1100 कोटींची जमीन आणि 405 कोटींचा बंगला ही सर्वात मोठी ठरली. 

1100 कोटींची जमीन आणि 405 कोटींचा बंगला! महाराष्ट्रात झाला भारतातील सर्वात मोठा व्यवहार

Expensive Deal: जमीन आणि घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच 2024 हे वर्ष भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रासाठी उत्कृष्ट ठरले. याच वर्षात रिअल इस्टेट क्षेत्रात  रेकॉर्डब्रेक करार झाले. भारतातील सर्वात मोठा व्यवहार  आपल्या महाराष्ट्रात झाला आहे. 1100 कोटींची जमीन आणि 405 कोटींचा बंगला अशी सर्वात महागडी डील झाली. भारतात कुठे झाली ही डील जाणून घेऊया. 

CRE Matrix च्या वार्षिक अहवाल 'बेस्ट ऑफ द बेस्ट 2024' मध्ये या वर्षातील प्रमुख व्यवहारांचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या यादीमध्ये जमीन, निवासी, कार्यालय, किरकोळ, गोदाम आणि रिअल इस्टेट कर्ज यासारख्या क्षेत्रातील सर्वात महाग डीलचा समावेश आहे. या वर्षातील सर्वात मोठ्या डीलबद्दल जाणून घेऊया.

मेट्रो ग्रुप प्रमोटर्सने मुंबईतील वरळी येथील प्रतिष्ठित 'पॅलेस रॉयल'मध्ये 405 कोटी रुपयांना एक आलिशान बंगला खरेदी केला. हा करार 2023 च्या सर्वात महागड्या डीलपेक्षा 31% जास्त होता. 38,390 चौरस फूट कार्पेट एरियाचा हा भव्य बंगला आहे. 2024 वर्षातील हा सर्वात मोठा निवासी करार मानला जातो.

बेंगळुरूतील नरसिंगी येथे Jaykay Infra ने 2480 युनिट्सचा प्रकल्प सुरू केला.  4.38 दशलक्ष चौरस फुटांमध्ये पसरलेले हा प्रोजकेक्ट 2024 मधील सर्वात मोठा निवासी प्रकल्प आहे. सर्वात महागडा जमीन व्यवहार मुंबईत झाला.  मुंबईतील लोअर परेल येथील 10 एकर जागेचा करार 1,100 कोटी रुपयांना झाला. हा करार या वर्षातील सर्वात महागडा जमीन करार मानला जात आहे. सेंच्युरी टेक्सटाईल्स अँड इंडस्ट्रीज आणि नेव्हिल वाडिया यांच्यात हा करार झाला. 

सर्वात महाग भाडे करार

Apple ने Maker Maxity, BKC, मुंबई येथे 6526 स्क्वेअर फूट जागा ऑफिस स्पेससाठी भाडेतत्वार घेतली. या जागेसाठी  प्रति चौरस फूट 738 रुपये प्रति महिना भाडे देण्याचे करार झाला आहे. हा  2023 च्या सर्वोच्च दरापेक्षा 66% जास्त भाडे करार ठरला. तर, दुसरीकडे सनग्लास हटने डीएलएफ गॅलेरिया, गुरुग्राम येथे 1,812 रुपये प्रति चौरस फूट दराने 414 चौरस फूट किरकोळ जागा भाडेतत्त्वावर घेतली.

सर्वात महागडे कार्यालय  

मुंबईतील ताडदेव  येथील एएए होल्डिंग ट्रस्टच्या कार्यालयाची जागा आयव्हरी प्रॉपर्टी ट्रस्टला प्रति चौरस फूट रुपये 1.5 लाखापेक्षा जास्त दराने विकली गेली. हा व्यवहार 2023 च्या तुलनेत 52% अधिक आहे.

Read More