Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

धक्कादायक! पोटच्या अल्पवयीन मुलीला निर्दयी बापाने 3 वेळा विकलं

एका निर्दयी बापानं पोटच्या लेकीला तीन वेळा विकल्याचा प्रकार उघडकीस आलाय. 

धक्कादायक! पोटच्या अल्पवयीन मुलीला निर्दयी बापाने 3 वेळा विकलं

नांदेड : पैशांसाठी कोण कुठच्या थराला जाईल याचा नेम नाही. नांदेडमध्ये एका निर्दयी बापानं पोटच्या लेकीला तीन वेळा विकल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या घटनेमुळे मुलींना विकणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. कसा घडलाय हा धक्कादायक प्रकार जाणून घेऊयात. (father sale her minor girl three time for marrige in nanded)

लग्नाच्या नावाखाली एका नराधम बापानं आपल्याच अल्पवयीन मुलीला तब्बल एक दोन नव्हे तर तीन वेळा विकलंय. सुभाष राठोड असं या नराधमाचं नाव आहे. नांदेड जिल्ह्यातल्या हदगावमध्ये हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडलाय. सुभाष राठोड आपल्या पहिल्या पत्नीला सोडून दुसऱ्या महिलेसोबत राहत होता. मात्र त्यानं अल्पवयीन मुलीला आपल्यासोबतच ठेवलं होतं. कारण त्याच्या मनात काळे मनसुबे होते. 

पैशांसाठी त्यानं सर्वात आधी 2018 मध्ये तिची विक्री केली. भावना चावला नावाच्या एजंटमार्फत राजकोटमधल्या एका व्यक्तीला त्यानं मुलीची विक्री केली. मात्र तिथं मुलीचा छळ होऊ लागल्यानं सुभाषनं तिला गावी आणलं. पुढे  2 महिन्यानंतर नंदुरबारच्या संदीप माळी नावाच्या व्यक्तीला तिची 2 लाखांत विक्री केली. मात्र माळीनं पैसे दिले नाहीत. त्यामुळे सुभाषनं तिला तिथूनही परत आणलं. त्यानंतर त्यानं साता-यातल्या विठ्ठल गायकवाडसोबत मुलीचा 2 लाखांत सौदा केला. पीडित मुलीनं कसाबसा फोनवरून आपल्या मावशीशी संपर्क साधला. त्यानंतर तिची सुटका झाली. 

मुलीच्या तक्रारीनंतर हदगाव पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांसह काही एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी नराधम बापासह 8 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. महिला आणि मुलींना बाहेरच्या गिधाडांकडून जेवढा धोका आहे तेवढाच त्यांच्या घरातूनही असल्याचं या घटनेमुळे अधोरेखित झालंय.  

Read More