Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मुख्यमंत्री फडणवीसांचा ड्रिम प्रोजेक्ट महाराष्ट्र दिनी सेवेत? नाशिक-मुंबई प्रवास 3 तासांत होणार

Maharashtra Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा या महाराष्ट्र दिनी सेवेत येण्याची शक्यता आहे. लवकरच मुंबई ते नाशिक प्रवास तीन तासांत पूर्ण होणार आहे.   

मुख्यमंत्री फडणवीसांचा ड्रिम प्रोजेक्ट महाराष्ट्र दिनी सेवेत? नाशिक-मुंबई प्रवास 3 तासांत होणार

Maharashtra Samruddhi Mahamarg: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा 1 मेला म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या खुला होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यादृष्टीने एमएसआरडीसीने तयारी सुरू केल्याचे समजते.

एमएसआरडीसीने 701 किमी लांबीचा आणि 55 हजार कोटी रुपयांचा निधी खर्चून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. हा संपूर्ण महामार्ग याआधीच वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, विविध कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब झाला आहे. दरम्यान, टप्प्याटप्प्याने आतापर्यंत 625 किमी लांबीचा नागपूर-इगतपुरी दरम्यानचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. आता इगतपुरी-आमणे, भिवंडी या शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा आहे.  इगतपुरी ते आमणे हा 76  किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महाराष्ट्र दिनी होणार खुला होणार असल्याची चर्चा आहे. 35 मीटर रुंद आणि 6 लेन  दुहेरी बोगद्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. 

इगतपुरी-आमणे, भिवंडी हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबईकरांना केवळ आठ तासांत नागपूर गाठता येणार आहे. आता ही प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. शेवटच्या टप्याचे 100 टक्के काम पूर्ण झाले असून, आता हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. 

समृद्धी महामार्गाची काही वैशिष्ट्ये

- हा 6 लेनचा, 120 मीटर रुंदीचा आणि 701 किलोमीटर लांब महामार्ग देशातील सर्वात अत्याधुनिक एक्सप्रेसवे आहे, जो 150 किमी प्रतितास गतीने प्रवासासाठी डिझाइन करण्यात आला आहे.

- महामार्गावर 65 फ्लायओव्हर, 24 इंटरचेंज, 6 बोगदे आणि अनेक वाहन तसेच पादचारी अंडरपास आहेत.

- इगतपुरी ते मुंबईदरम्यान कसारा जवळ 8 किलोमीटर लांब जुळ्या बोगद्यांपैकी एक बनवण्यात आला आहे, जो अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित फुल वॉटर मिस्ट सिस्टमने सुसज्ज आहे.

Read More