Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुण्यात चालत्या बसने घेतला पेट

पुण्यात धावत्या बसने पेट घेतला आणि एकच गोंधळ निर्माण झाला.

पुण्यात चालत्या बसने घेतला पेट

पुणे : धावत्या बसने पेट घेतला आणि एकच गोंधळ निर्माण झाला. पुण्यातल्या सीओइपी पुलावर पीएमपीएलच्या एका बसनं अचानक पेट घेतला. दुपारी ४ च्या दरम्यानची ही घटना आहे. इंजिनमधून धूर येत असल्याचं लक्षात येता बसच्या चालकानं सगळ्या प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवलं. त्यामुळे कुणाला इजा झाली नाही. 

ही बस विश्रांतवाडीहून कोथरूडला जात होती. अग्निशामक दलाची गाडी लगेचच घटनास्थळी दाखल झाली. मात्र तोवर बस मोठ्या प्रमाणावर जळली होती. बसच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

Read More