Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सातारा बस डेपोत शिवशाही बसेसला आग, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

 सातारा बस स्थानकात शिवशाही बसेसला आग 

सातारा बस डेपोत शिवशाही बसेसला आग, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

सातारा : सातारा बस स्थानकात शिवशाही बसला आग लागली आहे. चारहून अधिक शिवशाही बस आगीत खाक झाल्या आहेत. एका बसला आग लागल्यानंतर बाजूला उभ्या असलेल्या बसेसनंही पेट घेतला. आगीमुळे डेपोतील शिवशाही बसेसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एका बसला आग लागल्यानंतर ही आग पसरली. आणि बाजूला उभ्या असलेल्या बसनंही पेट घेतला. ज्या व्यक्तीमुळे ही आग लागली. त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Read More