Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

भरदिवसा भोसरीमध्ये तरुणावर गोळीबार

  भोसरी येथे एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली असून या घटनेत या तरुणाच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली आहे. 

भरदिवसा भोसरीमध्ये तरुणावर गोळीबार

 भोसरी :  भोसरी येथे एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली असून या घटनेत या तरुणाच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली आहे. 

  जखमी तरुणावर भोसरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. 
 
 या प्रकरणी पोलिसांनी  आरोपी अजिंक्य माने याला ताब्यात घेतले आहे. गणेशोत्सवाच्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते.

पंकज फुगे (23, रा. भोसरी) असे या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून आरोपी अजिंक्य माने यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी एक दुचाकी आणि एक बंदुकीची रिकामी काडतूस ताब्यात घेतली आहे

Read More