Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

जमिनीच्या वादातून तिघा सख्ख्या भावांवर गोळीबार

वसईत सोमवारी सकाळी जमिनीच्या वादातून तिघा सख्ख्या भावांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात जगदीश माळी याचा मृत्यू झाला असून, अन्य दोघे भाऊ गंभीर जखमी आहेत. 

जमिनीच्या वादातून तिघा सख्ख्या भावांवर गोळीबार

वसई : वसईत सोमवारी सकाळी जमिनीच्या वादातून तिघा सख्ख्या भावांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात जगदीश माळी याचा मृत्यू झाला असून, अन्य दोघे भाऊ गंभीर जखमी आहेत. 

सहा आरोपी फरार

कामणजवळच्या शिलोत्तर गावात ही घटना घडली. जखमींवर वसईच्या प्लॅटिनम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी वाळीव पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल केलाय. त्यामध्ये तिघा महिलांचा समावेश असून, त्यांना ताब्यात घेतलंय. तर अन्य 6 फरारी आरोपींचा पोलीस तपास करत आहेत. 

जमिनीचा वाद

या गोळीबाराच्या घटनेनंतर शिलोत्तर गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. संतप्त आदिवासी गावक-यांनी आरोपी महेंद्र ठाकूर याच्या बंगल्याची, कार्यालयाची तसंच मारूती वॅगनार गाडीची तोडफोड केली. शिवाय त्याच्या बहिणीच्या घराची, गाडीची आणि बुलेट गाडीची जाळपोळ केली. आरोपी महेंद्र ठाकूर हा बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता असून, पोलिसांनी त्याला सुरक्षितस्थळी हलवलंय.

Read More