Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

रत्नागिरीत मासेमारी करणाऱ्या बोटीला भीषण आग

रत्नागिरीत मासेमारी करणाऱ्या बोटीला भीषण आग

रत्नागिरी : रत्नागिरीतील हर्णे येथे समुद्रात एका मासेमारी करणाऱ्या बोटीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

बोटीला भीषण आग लागल्याने आगीत बोट संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. बोटीवरील खलाशांना वाचवण्यात यश आलं आहे.

खलाशी बोटवरुन मासेमारी करत असताना सिलेंडरचा अचानक स्फोट झाला आणि बोटीला आग लागली. या घटनेनंतर बोटीवरील खलाशांनी आराडा-ओरड केला. त्यांचा आवाज ऐकल्यानंतर स्थानिकांनी त्यांना सुखरुप बाहेर काढलं.

Read More