Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्रात या ठिकाणी १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीच फडकतो तिरंगा

ही प्रथा स्वातंत्र्यानंतर ७१ वर्ष सुरु आहे

महाराष्ट्रात या ठिकाणी १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीच फडकतो तिरंगा

अहमदनगर : संपूर्ण देशभरात स्वातंत्र्यदिनी सकाळी ध्वजारोहण करण्याची प्रथा आहे. पण अहमदनगर शहरातील दाणेडबरा मंगलगेट भागात १४ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ वाजता तिरंगा ध्वज फडकविण्यात येतो. ही प्रथा स्वातंत्र्यानंतर ७१ वर्ष सुरु आहे.

दिवंगत जेष्ठ स्वतंत्र सैनिक रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन यांनी १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री १२ वाजताच फडकवला होता. तीच प्रथा आजही कायम आहे.

नगरमधील व्यापारी, उद्योजक आणि स्वातंत्र्य सैनिक यात सहभागी होतात. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व रात्रीला जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक संघटनेच्या अध्यक्ष श्रीमती कलावती दारुणकर याच्या हस्ते हा ध्वज फडकविण्यात आला. 

Read More