Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Uddhav Thackeray: "तुमच्या काळ्या टोपीखाली काय दडलंय? महाराजांचा अपमान करणार असाल तर..."

Maharastra Politics: तुमच्या काळ्या टोपीखाली काय दडलंय त्याचा मान मी राखू शकत नाही. जर तुम्ही आमच्या महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान करणार असाल तर तुमचं वय कितीही असेल... 

Uddhav Thackeray:

Uddhav Thackeray On Bhagatsingh koshyari:  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) मोठा वाद झाला. कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात येत होती. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपाल कोश्यारींचे कान टोचले आहेत.

काय म्हणाले Uddhav Thackeray?

तुमच्या काळ्या टोपीखाली काय दडलंय त्याचा मान मी राखू शकत नाही. जर तुम्ही आमच्या महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान करणार असाल तर तुमचं वय कितीही असेल... तुम्ही तुमच्या घरामध्ये बसा. आमच्या दैवतांबद्दल खपवून घेणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. महिलेचा अपमान होत असताना तुम्ही काहीही करत नाही. वाघ आहात की गांडूळ आहात?, असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) विचारला आहे.

बुलढाणाच्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवर देखील आक्रमक टीका केली. भाजप (BJP) हा पक्ष आहे की चोरबाजार?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांच्या पक्षातील नेते पाहिल्यानंतर बाहेरच्या पक्षातील नेते जास्त असल्याचं दिसतंय. त्यामुळे भाजप हा आयात पक्ष झालाय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

आणखी वाचा - Maharastra Politics: "ज्यांना स्वत:चं भविष्य माहिती नाही, तो आपलं भविष्य ठरवणार", उद्धव ठाकरेंची खरमरीत टीका

दरम्यान, तुमचं भवितव्य ठरवणारे माय बाप दिल्लीत बसले आहेत. त्यांनी उठ बसलं म्हटलं उठायचं अन् बस म्हटलं बसायचं. आमचं सरकार व्यवस्थित चाललं होतं, मात्र त्यांनी सरकार पाडलं. त्यामुळे आता पुन्हा आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच, असा निश्चय देखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray On Shinde Group) यांनी केलाय. त्यावर आता शिंदे गट काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Read More