Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अमरावतीत भाजपाला धक्का! माजी मंत्री डॉ.सुनील देशमुख यांची पावलं काँग्रेसच्या दिशेने

आगामी काळात अमरावतीत काँग्रेसमधून भाजपात गेलेले नेते पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर येतील का हे दिसून येणार आहे.

अमरावतीत भाजपाला धक्का! माजी मंत्री डॉ.सुनील देशमुख यांची पावलं काँग्रेसच्या दिशेने

अनिरुद्ध दवाळे, झी २४ तास, अमरावती : अमरावतीत भाजपाला खिंडार पडणार आहे, माजी मंत्री आणि भाजपचे माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांचा काँग्रेसमध्ये अखेर प्रवेश निश्चित झाला आहे. डॉ. सुनील देशमुख हे मुंबईत काँग्रेसमध्ये १९ जून रोजी प्रवेश करणार आहेत, अशी माहिती स्वत: डॉ. सुनील देशमुख यांनी दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काही दिवसांपूर्वी अमरावतीत येऊन गेले. या दरम्यान अमरावतीत नाना पटोल आणि सुनील देखमुख यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत सुनील देशमुख यांनी घरवापसी निश्चित केली. यामुळे आगामी काळात अमरावतीत काँग्रेसमधून भाजपात गेलेले नेते पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर येतील का हे दिसून येणार आहे. 

डॉ.सुनील देशमुख यांची राजकीय कारकिर्द

डॉ. सुनील देशमुख हे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...
1999 ते 2004 काँग्रेस आमदार..
2004 ते 2009 दरम्यान काँगेस राष्ट्रवादी सरकार मध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम व अर्थराज्यमंत्री...
2014 मध्ये भाजप मध्ये प्रवेश व प्रवेश आणि अमरावती विधानसभा मतदार संघातून आमदार....

Read More