Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

गणपतीक गावाक निघालात! यंदा 60 दिवस आधीच गावची तिकीट बुक करावी लागणार, 'या' दिवसापासून Reservation सुरू


Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी गावाला जायला निघालात. तर 60 दिवस आधीच तुम्हाला तिकीट बुकिंग करावी लागणार आहेत. 

गणपतीक गावाक निघालात! यंदा 60 दिवस आधीच गावची तिकीट बुक करावी लागणार, 'या' दिवसापासून Reservation सुरू

Ganesh Festival 2025: कोकणासह समस्त महाराष्ट्रीय नागरिकांना वेध लागलेत ते गणेशोत्सवाचे. या वर्षी गणेशोत्सव 27 ऑगस्टलाच आला आहे. गणेशोत्सव लवकर आल्याने प्रवाशांना आता चिंता लागून राहिलेये ती ट्रेनच्या तिकीटांची. चाकरमान्यांची रेल्वेची तिकीटे मिळवण्यासाठी आत्तापासून धावपळ सुरू आहेय दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वे प्रशासनाने गणपती स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गणपती स्पेशल गाड्यांसाठी तिकीट आरक्षण आता 23 जूनपासून सुरू करण्यात येत आहे. म्हणजे यंदा 60 दिवस आधी ट्रेनचे आरक्षण करावे लागणार आहे. 

यंदा 27 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत आहे तर 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे. अनेक चाकरमानी हे 5-7 दिवसांच्या गणपती उत्सवासाठी गावी जात असतात. तर काही जणांना गणेशोत्सवाची तयारी करायची असते. त्यामुळं बाप्पा येण्याच्या दोन दिवस आधी कोकणात पोहोचतील अशीच तिकीटांचे आरक्षण करतात. त्यामुळं 25 आणि 26 ऑगस्टला कोकणात पोहचण्यासाठी त्या दिवसांच्या गाड्यांच्या आरक्षणाला जादा मागणी असते. यामुळे 60 दिवसआधी आगाऊ आरक्षणाच्या तारखांचा तक्ता कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर केला आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्यापही रखडलेलेच आहे. अशातच रस्त्यात खड्डे असल्यामुळं रस्ते मार्गाने जाणे प्रवाशांसाठी हैराणीचे ठरते. तसंच वाहतूक कोंडीमुळं रस्त्यातच अडकून पडावे लागते. त्यामुळं रेल्वेमार्गाचा प्रवास हा नागरिकांसाठी खूप सोयीचा ठरतो. मात्र चाकरमान्यांची संख्या इतकी जास्त असते की रेल्वेचे तिकीट मिळणे खूप मुश्किल होऊन जाते. त्यामुळं मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वेकडूनही जादा गाड्या सोडल्या जातात. यंदाही 250 ट्रेन सोडण्यात येवू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

आरक्षण दिनांक –      प्रवासाचा दिनांक
२३ जून, सोमवार –      २२ ऑगस्ट, शुक्रवार

२४ जून, मंगळवार –     २३ ऑगस्ट, शनिवार

२५ जून, बुधवार –      २४ ऑगस्ट, रविवार

२६ जून, गुरुवार –   २५ ऑगस्ट, सोमवार

२७ जून,शुक्रवार – २६ ऑगस्ट, मंगळवार – हरितालिका

२८ जून, शनिवार – २७ ऑगस्ट, बुधवार – श्री.गणेश चतुर्थी

२९ जून, रविवार – २८ ऑगस्ट, गुरुवार – ऋषी पंचमी

३० जून, सोमवार – २९ ऑगस्ट, शुक्रवार

०१ जुलै, मंगळवार – ३० ऑगस्ट, शनिवार

०२ जुलै, बुधवार – ३१ ऑगस्ट, रविवार – गौरी आगमन

०३ जुलै, गुरुवार – ०१ सप्टेंबर, सोमवार – गौरी पूजन

०४ जुलै,शुक्रवार- ०२ सप्टेंबर,मंगळवार – गौरी गणपती

Read More