Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

जनता दरबारावरुन गणेश नाईकांचं एकनाथ शिंदेंना आव्हान

आमदार, मंत्र्यांना कुठेही जनता दरबार घेता येतो असं विधान त्यांनी केलं. तर जिल्ह्यात दोन-दोन आमदार असून पालकमंत्री जनता दरबार घेतात असा टोला नरेश म्हस्केंनी लगावला.

जनता दरबारावरुन गणेश नाईकांचं एकनाथ शिंदेंना आव्हान

मुंबई : जनता दरबाराच्या मुद्द्यावरुन गणेश नाईकांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना आव्हान दिल्याची चर्चा आहे. आमदार, मंत्र्यांना कुठेही जनता दरबार घेता येतो असं विधान त्यांनी केलं. तर जिल्ह्यात दोन-दोन आमदार असून पालकमंत्री जनता दरबार घेतात असा टोला नरेश म्हस्केंनी लगावला.

गणेश नाईकांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना आव्हान दिल्याचं बोललं जातंय. काही महिन्यांपूर्वी गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जात जनता दरबार घेतला होता. दरम्यान यानंतर चांगलंच राजकारण तापलं होतं. मात्र, पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येकाला कुठेही जनता दरबार घेण्याचा अधिकार असून त्यात कोणतंही गैर नसल्याचं गणेश नाईकांनी म्हटलंय.

हेही वाचा : लग्नाच्या वऱ्हाडासाठी संपूर्ण कोच बुक करायचाय? ही ट्रीक तुमच्या येईल कामी!

 

दरम्यान काही दिवसांपूर्वी गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. शिंदेंच्या कार्याकाळात कामं झाली नसल्याचा आरोप गणेश नाईकांनी केला होता. दरम्यान यानंतर योगेश कदमांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं.

गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधला वाद तसा जुनाच आहे, गणेश नाईक मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंना वारंवार डिवचताना दिसताय. मात्र, पुन्हा एकदा जनता दरबारावरुन गणेश नाईकांनी शिंदेंना आव्हान दिल्याची चर्चा आहे.

Read More