Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'तो' एक नियम बदलल्याने गणेशोत्सवातील ST रिझर्व्हेशनला दणक्यात प्रतिसाद; या 3 शहरांतून सुटणार बसेस

Ganeshotsav News:गणपती उत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने यंदा पाच हजार जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.   

'तो' एक नियम बदलल्याने गणेशोत्सवातील ST रिझर्व्हेशनला दणक्यात प्रतिसाद; या 3 शहरांतून सुटणार बसेस

Ganeshotsav News: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येतेय. गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच मुंबई-पुण्यातील चाकरमान्यांना वेध लागतात ते गावी जाण्याचे. कोकणात जाण्यासाठी रेल्वेचे तिकीटे मिळणे म्हणजे खूपच कठिण असते. अशावेळी बरेच चाकरमानी एसटीवर अवलंबून असतात. चाकरमान्यांसाठी राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने 23 ते 27 ऑगस्ट कालावधीत 5,200 बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 23 ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बस स्थानकातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. 

मुंबईतून कोकणात थेट आपल्या गावी पोहोचता यावे म्हणून अनेकांना एसटीची सुविधा सोयीची वाटते. यंदा गणेशोत्सव 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यातारखेपासूनच कोकणात विशेष एसटी चालवण्यात येणार आहे. शेकडो बसचे गट आरक्षण झाले असून बस उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाची आखणी सुरू आहे. जादा वाहतुकीसाठी प्रत्येक आगारात, प्रत्येक बससोबत वाहक पाठविला जाणार नसून आगाराच्या एकूण एसटीला दोन वाहक पाठविण्यात येतील,

यंदा मुंबई विभागातून स्वतःच्या 600 बस कोकणात सोडण्यात आल्या आहेत. तसेच, नाशिक, पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर अशा विविध विभागातून 4 हाजारांपेक्षा जास्त बस मागवण्यात आल्या आहेत. तसंच, प्रत्येक बसमध्ये फक्त 40 प्रवासीच असावेत, असे नियोजन करण्यात येणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. 

कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकेही तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरुपाची प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहेत. 

भाडेवाढ रद्द केल्यानंतर सामूहिक आरक्षणाला वेग

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने गणेशोत्सवासाठीच्या समूह आरक्षणातील 30 टक्के भाडेवाढ रद्द केल्यानंतर त्याचा सकारात्मक परिणाम समोर आला आहे. महामंडळाच्या बसगाड्यांचे समूह आरक्षण पूर्ण झाले आहे. त्यानंतर एक हजार 406 गाड्यांचे वैयक्तिक आरक्षण सुरू करण्यात आले आहेत. महामुंबईतील मुंबई, पालघर आणि ठाणे विभागातून उत्सव विशेष वाहतुकीचे आरक्षण खुले करण्यात आले आहे. मुंबईतून सर्वाधिक 329 बसगाड्यांचे आरक्षण करण्यात आले. पालघरमधून 275 आणि ठाण्यातून 175 बसगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. तिन्ही विभागांत एकूण एकहजार 406 गाड्यांचे आरक्षण सुरू आहे. यापैकी 786 गाड्यांचे समूह आरक्षण आणि 510 बसगाड्यांचे वैयक्तिक आरक्षण पूर्ण झाले असून, सद्यस्थितीत 110 गाड्यांचे आरक्षण सुरू आहे.

Read More