Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय! 'कार ऑन ट्रेन' आता सिंधुदुर्गातील 'या' स्थानकातही थांबणार

Kokan Railway Ganeshotsav News: कोकण रेल्वेने 23 ऑगस्टपासून रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोवा राज्यातील वेर्णा दरम्यान कार ऑन ट्रेन ही सेवा सुरू केली आहे. आता या सेवेत एक बदल करण्यात आला आहे. 

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय! 'कार ऑन ट्रेन' आता सिंधुदुर्गातील 'या' स्थानकातही थांबणार

Kokan Railway Ganeshotsav News: गणेशोत्सवदरम्यान चाकरम्यानाचा प्रवास सुकर व्हावा यासाठी कोकण रेल्वेने कार ऑन ट्रेन सुविधा सुरू केली आहे. मात्र या सेवेला नागरिकांना अल्प प्रतिसाद लाभत आहे. नागरिकांचा प्रतिसाद वाढावा यासाठी कोकण रेल्वेने एक मोठे पाऊल उचलले आहे. 

गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लाखांपार असते. रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येतात. मात्र या रेल्वेचे आरक्षण काही सेकंदातच फुल्ल होते. त्यामुळं अनेकांना रेल्वेची तिकीटे मिळतच नाहीत. तसंच, मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्यापही रखडले आहेत. त्यामुळं मार्गात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून त्यामुळं वाहतुक कोंडींची समस्या निर्माण होते. या परिस्थितीतच कोकण रेल्वेने कार ऑन ट्रेन ही सेवा सुरू केली होती. यामुळं नागरिकांना कार थेट ट्रेनच्या माध्यमातून कोकणात नेता येणार आहे. मात्र या सुविधेला अल्पप्रतिसाद लाभत आहे. 

कोकण रेल्वेची ही सुविधा 23 ऑगस्टपासून रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोवा राज्यातील वेर्णा दरम्यान ही सेवा सुरू होणार आहे. मात्र रेल्वेची ही सेवा फक्त गोव्यापर्यंतच आहे. कारण रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत कोणताही पिकअप पॉइंट नसल्याने दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना या सेवाचा लाभ घेता येणार नाही.  त्यामुळं अनेकांनी या सुविधेकडे पाठ फिरवली होती. त्यामुळं कोकण रेल्वेने आता आणखी एक स्थानकाचा समावेश केला आहे. 

कोकण रेल्वेने मंगळवारी केलेल्या घोषणेनुसार, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव रोड स्टेशनवर थांबा देण्यात येणार आहे. यामुळं नागरिकांचा आणखी प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'प्रवासी आता नांदगाव रोडवर त्यांच्या गाड्या लोड आणि अनलोड करू शकतात. ज्यामुळे प्रवास अधिक सूकर होणार आहे. रो-रो कार ट्रान्सपोर्टेशन सेवेसाठी कार बुकिंगसाठी नोंदणी 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे," असे अधिकृत प्रवक्त्याने सांगितले.

कोकण रेल्वे गणेशोत्सव 2025: कार ऑन ट्रेन सुविधा (FAQ)

1) कोकण रेल्वेची ‘कार ऑन ट्रेन’ सुविधा म्हणजे काय?

‘कार ऑन ट्रेन’ ही कोकण रेल्वेची एक खास रो-रो (रोल-ऑन रोल-ऑफ) सेवा आहे, ज्यामुळे प्रवासी त्यांच्या खासगी कार ट्रेनद्वारे कोकणात नेऊ शकतात. यामुळे गणेशोत्सवादरम्यान रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि लांबचा प्रवास टाळता येतो.

2) ‘कार ऑन ट्रेन’ सेवेचा शुल्क किती आहे?

एका कारसाठी एकेरी प्रवासाचा खर्च ₹7,875 आहे. याशिवाय प्रवाशांसाठी 3AC कोचमध्ये ₹935 प्रति व्यक्ती (जास्तीत जास्त 2 व्यक्ती प्रति कार) आणि SLR कोचमध्ये ₹190 (1 अतिरिक्त व्यक्ती) शुल्क आहे.

3) या सेवेचा प्रवास किती वेळात पूर्ण होतो?

कोलाड ते वेर्णा हा प्रवास सुमारे 12 तासांत पूर्ण होतो, जो रस्त्याने 20-22 तासांच्या तुलनेत खूपच कमी आहे. ट्रेन कोलाड येथून सायंकाळी 5 वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता वेर्णा येथे पोहोचते.

Read More