Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

गावदेवीतली ही रांगोळी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतेय

ठाण्यातील गावदेवी परिसरात हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय.

गावदेवीतली ही रांगोळी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतेय

ठाणे : ठाण्यातील गावदेवी परिसरात हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने गावदेवी मैदानात आकर्षक अशी रांगोळी साकारण्यात आलीय. इथं अठरा हजार चौरस फूट परिसरात महाकाय अशी रांगोळी साकारण्यात आलीय.

जवळपास ७० कलाकारांच्या ९ तासांच्या अथक मेहनतीनंतर ही रांगोळी साकार झालीय. यंदा सुलेखनाच्या माध्यमातून शांतीचा संदेश देण्यात आलाय. ही रांगोळी पाहण्यासाठी ठाणेकरांनी मोठी गर्दी केलीय. 

Read More