Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

चिमुरडीच्या मृत्युनंतर नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, हॉस्पिटलची तोडफोड

भाजलेल्या एका 3 वर्षाच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर, संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली आहे.

चिमुरडीच्या मृत्युनंतर नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, हॉस्पिटलची तोडफोड

नाशिक : भाजलेल्या एका 3 वर्षाच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर, संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली आहे, तसेच हॉस्पिटलचंही मोठं नुकसान केलं आहे. गुलाबजाम बनविण्यासाठी तयार केलेल्या साखरेच्या गरम पाकाच्या पातेल्यात 3 वर्षाची चिमुरडी पडली. ती गंभीररित्या भाजल्याने तिला खासगी हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पंचवटीमधील हिरावाडीतील कालिकानगर येथील साईनाथ रो-हाउसमध्ये घडली़, स्वरा प्रवीण शिरोडे असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी या खासगी रुग्णालयाची तोडफोड केली आहे. हिरावाडीती साईनाथ रो-हाउस नंबर चारमध्ये शिरोडे कुटुंबीय राहत आहे, त्यांचा केटरिंग व्यवसाय आहे. 

रविवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास ऑर्डरसाठी लागणारे गुलाबजाम बनविण्यासाठी एका पातेल्यात साखरेचा पाक तयार करण्यात आला होता. यावेळी तीन वर्षांची स्वरा ही खेळता-खेळता पातेल्याजवळ आली आणि गरम पाकाच्या पातेल्यात पडल्याने ती गंभीररीत्या भाजली़ शिरोडे कुटुंबीयांनी चिमुरड्या स्वराला उपचारासाठी प्रथम आडगाव शिवारातील एका खासगी रुग्णालयात नेले मात्र, त्यांनी दाखल करून घेतले नाही़.

यानंतर नातेवाईकांनी तातडीने आडगाव नाक्यावरील खासगी रुग्णालयात स्वराला दाखल केले़, या रुग्णालयाने उपचारापूर्वीच सांगितलेली अनामत रक्कम भरायला सांगितली, यानंतर नातेवाइकांनी बाहेरून औषधेही आणून दिली़ यानंतर दुपारच्या सुमारास उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले, यामुळे नातेवाइकांचा संताप झाला आणि त्यांनी उपचारातील हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत, या रुग्णालयाची तोडफोड केली आहे.

Read More