Gold Silver Rate Today : गुढीपाडवा हा सण रविवारी 30 मार्चला साजरा करण्यात येणार आहे. वर्षातील साडेचार मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. हिंदू पंचांगानुसार ही नवीन वर्षाची सुरुवात असते. याच महिन्यापासून वसंत ऋतूस सुरुवात होते. यादिवशी सोने, चांदी खरेदीसह शुभ घर खरेदी आणि गाडी खरेदीचा उत्साह दिसून येतो. गुढीपाडव्याचा मुहूर्ता महिला वर्गामध्ये सर्वांधिक उत्साह दिसून येतो. साडेचार मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असलेल्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यात येते. या आठवड्याची सुरुवात सोनं - चांदीचे भाव घसरल्याने झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंद होता. पण गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधीच ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. कारण जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या दरामध्ये वाढ झालीये.सोन्याच्या दरात 1300 रुपयांनी वाढ झालीये. तर चांदीच्या दरात एक हजारांनी वाढ झाली आहे. सोनं प्रतितोळा 92 हजार रुपयांवर पोहोचलाय. तर चांदी प्रतिकिलो 1 लाख 5 हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
मागील दोन दिवसांपूर्वी जळगावमध्ये सोन्याचे दर 88 हजार रुपये इतके होते. आज अचानक या दरात 1300 रुपयांनी वाढ झाल्यामुळे सोन्याचा आजचा दर 89 हजार 300 रुपयांवर गेला आहे. हाच दर जीएसटीसह 92 हजार रुपयांपर्यंत गेल्याने जळगावमध्ये ग्राहकांचा सोनेखरेदीला काहीसा कमी प्रतिसाद पाहिला मिळतो आहे.
2 एप्रिल रोजी ट्रारिफ रेट लागू होणार असल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे अशी माहिती सुवर्ण व्यवसायिकांनी दिली आहे. 30 मार्च रोजी गुढीपाडवा असल्याने अनेकजण सोन्याची खरेदी करतात. पण सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या दुकानांमधील गर्दी कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.
- 22 कॅरेट 1 ग्रॅम सोनं आज 8,355 रुपयांना मिळेल.
- 22 कॅरेट 8 ग्रॅम सोनं आज 66,840 मिळेल.
- 10 ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 83,550 एवढा आहे.
- तर 100 ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,35,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे.
- 24 कॅरेट 100 ग्रॅम सोनं 9,11,300 रुपये किंमतीने विकतंय.
- 10 ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 91,130 रुपये इतका आहे.
- 8 ग्रॅम सोनं आज 72,904 रुपये इतका आहे.
- 1 ग्रॅम सोनं 9,113 रुपयांनी विकलं जात आहे.