Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सोनं खरेदी करावं की मोडावं? ग्राहक बुचकळ्यात! सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळी

Gold Rate: जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.  

सोनं खरेदी करावं की मोडावं? ग्राहक बुचकळ्यात! सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळी

Gold Rate: सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सतत चढ उतार होताना दिसत आहेत. यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांमध्येही संभ्रम निर्माण होताना दिसत आहे. सोनं खरेदी करावं की नाही या बुचकळ्यात ते पडले आहेत. त्यातच आज जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर 2300 रुपयांनी तर चांदीच्या दरात 3 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

सोन्याचे दर जीएसटीसह 94 हजार 40 रुपयांवर पोहोचले आहे, तर चांदीचे दर 96 हजार 820 रुपयांवर पोहोचले आहेत. अमेरिका आणि चीनमध्ये सध्या व्यापार युद्ध सुरु असून, त्याचे परिणाम बाजारावर उमटताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 125 टक्के आयातशुल्क लागू केला आहे. याचा परिणाम सोने चांदीच्या दरावर झाला आहे.

Gold Rate: सोनं मोडीत काढण्यासाठी घाई, सराफा दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी, नेमकं काय झालं?

 

गेल्या आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरू आहे. 2 एप्रिल रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे सोन्याचे भाव आणखी पडतील या भीतीने मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी आहे त्या दरात सोनं मोडलं. आज पुन्हा दरवाढल्यामुळे ग्राहकांचा भ्रमनिरास झाला आहे. सोने चांदीच्या दरातील मोठ्या चढउतारामुळे जळगाव जिल्ह्यातील ग्राहक खरेदी करावी की मोड करावी या संभ्रमात असल्याचं पाहायला मिळत आहे.

अफवेमुळं ग्राहकांकडून सोनं विक्री

94 हजार रुपये तोळं किमतीला पोहचलेलं सोनं गेल्या काही दिवसांपासून उतरणीला लागलं आहे. सोन्याच्या किंमतीत अचानक घसरण होऊ लागली आहे. सोन्याचा भाव 55 हजार रुपये तोळे एवढा होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेची लोकांनी एवढी धास्ती घेतलीये की सुवर्णनगरी जळगावमध्ये लोकांनी दागिने मोडण्यास सुरुवात केली आहे. आता जेवढा भाव आहे तेवढा भाव मिळाली तरी काही पैसे मिळतील अशी भावना असल्यानं लोकांनी तयार केलेले दागिने मोडण्यास सुरुवात केली आहे. 

सोन्याचा भाव एक लाख रुपयांवर जाईल या आशेनं अनेकांनी पूर्वीच सोनं खरेदी केली. त्यांना आता सोन्याच्या भावात घसरण झाल्यानं सोनं विक्री करायला सुरुवात केलीय असं दुकानदार सांगतात.

एकाचवेळी शेअर मार्केट कोसळणं आणि सोन्याच्या भावात घसरण होणं असं सहसा होत नाही. पण काही जागतिक घडामोडींमुळं सोनं घसरणीला लागल्याचं तज्ज्ञ सांगू लागले आहेत.

Read More