Gold Price Today: शेअर बाजार ते सराफा बाजारापर्यंत मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. काल सोन्याच्या दरात घट झाली होती. मात्र आत त्याउलट सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळतेय. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं $3,024 पोहोचलं असून नवीन उच्चांक गाठला आहे. तर, सराफा बाजारातही सोन्याचे दर वाढले आहेत. MCXवर सोन्याने 88,418 रेकॉर्डवर पोहोचले आहे. या वर्षात सोन्याच्या किंमती 14 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर, मागील वर्षीत यात 35 टक्क्यांची वाढ झाली होती. तर, एकीकडे चांदीनेदेखील रेकॉर्ड नोंदवला आहे. घरगुती बाजारात चांदी ₹1,01,000 च्या पार पोहोचली आहे.
अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार तणावामुळे आणि जागतिक अनिश्चिततेमुळे, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढत आहे. अमेरिकन डॉलरच्या घसरणीमुळं सोन्याची मागणी वाढली आहे. डॉलर घसरल्यानंतर गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. वाढत्या महागाईच्या काळात, गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून विचारात घेत आहेत, त्यामुळे त्याच्या किमती वाढल्या आहेत.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रुपयांची वाढ झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचे दर 90,000 रुपयांवर पोहोचले आहेत. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांची घट झाली असून एक तोळा सोन्याच्या किंमती 82,500 रुपयांवर पोहोचल्या आहेत. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 320 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅम सोनं 67,500 रुपयांवर पोहोचलं आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 82,500 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 90,000 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 67,500 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 8,250 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 9,00 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 6,750 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 66, 000 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 72,000 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 54,000 रुपये
22 कॅरेट- 82,500 रुपये
24 कॅरेट- 90,000 रुपये
18 कॅरेट- 67,500 रुपये