Gold Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात घडलेल्या घडामोडींनंतर आज पुन्हा एकदा MCX वर सोनं स्वस्त झालं आहे. मौल्यवान धातुबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घट झाली आहे. आज चांदीचे दर 480 रुपयांनी घसरले आहेत. त्याचबरोबर 94924 रुपये प्रतिकिलोवर चांदी आज व्यवहार करत आहे. गेल्या एक महिन्यापासून सोन्याने ग्राहकांना व गुंतवणुकदारांना चांगला परतावा दिला होता. सराफा बाजारात तर काही ठिकाणी सोन्याची किंमत 1लाखांपार गेली होती. मात्र आता सोन्याचे दर घसरले आहेत.
कमोडिटी बाजारात सोनं-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. शुक्रवारी सोनं आंतरराष्ट्रीय बाजारात 50 डॉलरने घसरल्यानंतर आता 2,325 डॉलरपर्यंत स्थिरावलं आहे. सराफा बाजारात सोनं 900 रुपयांनी घसरून 95,000पर्यंत स्थिरावले होते. तर चांदीदेखील दीड टक्क्यापर्यंत घसरली होती. त्यानंतर प्रतिकिलो चांदी 96,200 रुपयांपर्यंत घसरली होती. त्यानंतर आज सोमवारी 28 एप्रिल रोजी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट सोनं 680 रुपयांनी घसरले असून प्रतितोळा सोनं 97,530 रुपयांवर स्थिरावलं आहे.
एमसीएक्सवर आज 22 कॅरेट सोन्याचे दर 620 रुपयांनी घसरले असून 89,400 रुपये प्रतितोळा आहेत. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 680 रुपयांनी कमी होऊन प्रतितोळा 97,530 रुपयांवर स्थिरावले आहेत. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याचे 510 रुपयांनी स्वस्त होऊन 73,150 रुपयांवर पोहोचले आहेत.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 89,400 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 97,530 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 73,150 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 8,940 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 9,753 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,315 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 71,520 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 78,024 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 58,520 रुपये
22 कॅरेट- 89,400 रुपये
24 कॅरेट- 97,530 रुपये
18 कॅरेट- 73,150 रुपये