Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Lampi Virus : जनावरं होणार लम्पीमुक्त! 'ही' उपचार पद्धती ठरणार रोगावरचं ब्रम्हास्त्र

शेतकऱ्यापासून ते सरकारी यंत्रणांपर्यंत सर्वजण या रोगासंदर्भात (Lampi Virus) उपाय योजना शोधण्याचं काम करत आहेत.

Lampi Virus : जनावरं होणार लम्पीमुक्त! 'ही' उपचार पद्धती ठरणार रोगावरचं ब्रम्हास्त्र

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : राज्यात जनावरांमध्ये झपाट्याने वाढत असलेल्या लम्पी रोगामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. शेतकऱ्यापासून ते सरकारी यंत्रणांपर्यंत सर्वजण या रोगासंदर्भात उपाय योजना शोधण्याचं काम करत आहेत. काही सेवाभावी संस्थांद्वारे देखील लंम्पी रोगाला आळा घालण्यासाठी उपाय योजना करत आहेत.

या रोगावर ठोस निर्णय घेऊन आळा घालण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील देवलापार गो विज्ञान अनुसंधान केंद्राच्या वैद्यांनी उपचार पद्धती शोधल्याचा दावा केला आहे. 'जनावरांना गोमुत्र पाजून लंम्पीमुक्त ठेवता येतं', असा दावा या केंद्राच्या प्रमुख वैद्य प्रधान वैद्य नंदिनी भोजराज यांनी केला आहे. 

लम्पिचा संसर्ग न झालेल्या गुरांचे मूत्र इतर गुरांना पाजल्यामुळे त्यांची व्याधीप्रतिकार शक्ती वाढल्याचं दिसून आले आहे. 2018 -2019 ला देवलापार गो विज्ञान अनुसंधान केंद्रातील (Go-Vigyan Anusandhan Kendra) सुमारे 25 गुरांना लम्पी झाला होता. त्यावेळी, गोमूत्र पाजून आणि इतर आयुर्वेदिक उपचार पद्धतीमुळे या रोगाला आटोक्यात आणलं होतं. 

लम्पी रोगाने आता पुन्हा डोकंवर काढल्यानंतर गोमूत्र सुरुवातीपासूनच पाजल्यामुळे देवलापार गो विज्ञान अनुसंधान केंद्रातील सुमारे 850 गुरांपैकी एकही गुराला लंपीची बाधा झालेली नाहीय. देवलापार गोविज्ञान अनुसंधान केंद्रातील प्रधान आयुर्वेदिक चिकित्सक नंदिनी भोजराज यांच्या कडून गुरांना लम्पिमुक्त ठेवण्याच्या दृष्टीने त्यांनी तयार केलेल्या उपचार पद्धती बाबत जाणून घेतला आहे.

गुरांना लम्पीमुक्त करण्यासाठी या पद्धतींचा वापर करावा...

1)जनावराला 100 मि.ली. वासराला 50 मि.ली. गोमूत्र उकळून द्यावं.  
2) गौरी आणि कडुलिंबाचं धूपन जनावरांच्या परिसरात द्यावं. 

Read More