Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुणेकरांसाठी म्हाडाची खूशखबर, जितेंद्र आव्हाड यांची विधानसभेत मोठी घोषणा

पुणेकरांना लवकरच मोठी गुडन्यूज मिळणार आहे. 

पुणेकरांसाठी म्हाडाची खूशखबर, जितेंद्र आव्हाड यांची विधानसभेत मोठी घोषणा

मुंबई : पुणेकरांसाठी सरकारने गुडन्यूज दिली आहे. पुण्याच्या धानोरी येथे म्हाडाने १०० एकर जागा घेतली असून या ठिकाणी 8 हजार घरं म्हाडाकडून बांधण्यात येणार आहेत. 'रेडीरेकनर पेक्षा कमी दराने जागा घेतली असून या ठिकाणी ८ हजार घर बांधली जाणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत दिली आहे.

पुणेकरांचं घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण राज्य सरकारने पुन्हा एकदा पुण्यात नवं गृहनिर्माण प्रकल्पाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये जवळपास 8 हजार घरांचा समावेश असणार आहे. सर्वसामान्यांना परवडणारी घरं म्हाडा बांधणार आहे.

Read More