Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुणेकरांसाठी खूशखबर ! पुणे - लोणावळा मार्गावर लोकल फेऱ्यांत वाढ

​Pune-Lonavla Local News :कोरोना काळात अनेक लोकलच्या फेऱ्या रदद् करण्यात आल्या होत्या. मात्र कोविडचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर प्रथमच लोकलच्या फेऱ्यात वाढ करण्यात आली आहे.  

पुणेकरांसाठी खूशखबर ! पुणे - लोणावळा मार्गावर लोकल फेऱ्यांत वाढ

पुणे : Pune-Lonavla Local News :कोरोना काळात अनेक लोकलच्या फेऱ्या रदद् करण्यात आल्या होत्या. मात्र कोविडचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर प्रथमच लोकलच्या फेऱ्यात वाढ करण्यात आली आहे. लोणावळा - पुणे - लोणावळा लोहमार्गावर तीन अधिकच्या लोकल सुरु करण्यात मध्य रेल्वेने मान्यता दिली आहे. यामुळे नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय दूर होणार आहे. 

लोणावळा - पुणे - लोणावळा मार्गावर सध्या लोकलच्या आठ गाड्या धावत होत्या, त्यामध्ये आता तीन लोकलची भर पडणार आहे. मध्य रेल्वे पुणे विभागाचे वरिष्ठ डीओएम स्वप्नील निला यांनी  हे पत्रक विभागीय व्यवस्थापक यांच्या मान्यतेने प्रसिद्ध केले आहे.

 नव्या वेळापत्रकानुसार पुणे ते लोणावळा दरम्यान गाडी क्र. 1556 ही पुण्याहून सकाळी 5.45 वाजता सुटेल. गाडी क्र. 1562 ही 9.55 वाजता व 1570 ही सायंकाळी 5.15 वाजता सुटेल. 

तसचे लोणावळा पुणे दरम्यान लोणावळ्यातून गाडी क्र. 1555 ही सकाळी 7.25 वाजता सुटेल. तर गाडी क्र. 1561 ही दुपारी 2.50 वाजता पुणे स्टेशन पर्यत सुटेल. तसेच 1569 ही सायंकाळी 7.00 वाजता शिवाजीनगर स्टेशन पर्यत धावणार आहे. याव्यतिरिक्त पूर्वीच्या गाडया वेळेत धावतील, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Read More