Maitri Mangal Software Engineer: शहर जितके मोठे तितके खर्च जास्त. न्यू यॉर्कमध्ये राहणाऱ्या मैत्री मंगल या भारतीय मुलीनेही याला दुजोरा दिलाय. मैत्रीने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पगाराचे वास्तव सांगितले आहे. यातून न्यू यॉर्कसारख्या शहरात राहणे किती महाग आहे, हे आपल्या लक्षात येईल. तिची पोस्ट खूप व्हायरल झाली आणि त्यावर हजारो लोकांनी कमेंटही केल्या आहेत. मैत्री गुगलमध्ये काम करते आणि तिचे पगार पॅकेज सुमारे 1.6 कोटी रुपये आहे. तुम्ही मोठ्या शहरात राहत असाल तर 7 आकड्यांचे पॅकेजही कमी पडेल, असा दावा तिने कलाय.
मैत्रीने न्यू यॉर्कमध्ये पॉडकास्ट करणाऱ्या कुशल लोढासोबत तिचे अनुभव शेअर केले. तिच्या संभाषणात तिने कंपनीकडून तिला मिळणाऱ्या पैशांबद्दल आणि अमेरिकेतील तिच्या खर्चाबद्दल सांगितले. न्यूयॉर्कमध्ये राहताना खर्च भागवण्यासाठी मोठा पगार देखील पुरेसा नाही. जर तुम्हाला न्यू यॉर्कसारख्या आलिशान शहरात राहायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करण्यास तयार राहावे लागेल, असे तिने सांगितले.
मैत्रीने या पॉडकास्टमध्ये अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना गुगल किती पगार देते हे उघड केले आहे. या पदासाठी सरासरी 1.6 कोटी रुपयांचे पगार पॅकेज दिले जाते. पण अमेरिकेत राहणे स्वस्त नाही. जर त्यांचे पॅकेज मासिक पगाराच्या बाबतीत पाहिले तर ते दरमहा सुमारे 13 लाख रुपये इतके होते.
इतके पैसे मिळूनही माझे मासिक खर्च क्वचितच भागतात, असे मैत्रीने सांगितले. न्यू यॉर्क हे जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक आहे. मैत्रीने सोशल मीडियावर ज्या अपार्टमेंटचा फोटो पोस्ट केलाय त्याचे भाडे दरमहा 2.5 लाख रुपये आहे. दरमहा सुमारे 5 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 4.2 लाख रुपये फक्त आवश्यक वस्तूंवर खर्च केले जातात. याशिवाय दररोजच्या खर्चावर 1 ते 2 हजार डॉलर्स खर्च केले जातात. जे भारतीय रुपयांमध्ये 86 हजार ते 1.71 लाख रुपयांपर्यंत असते. याशिवाय सुमारे 200 डॉलर्स म्हणजेच 17 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम वाहतूक खर्च म्हणून खर्च होते.
बऱ्याच युजर्सनी मैत्रीच्या पोस्टवर तिला सूचनाही दिल्यायत. ज्यामध्ये खर्च कमी करण्याचे आणि न्यू यॉर्कमध्ये राहण्याचे मार्ग सांगण्यात आलेयत. न्यू यॉर्कसारख्या शहरात राहताना उत्पन्न आणि खर्चात खूपच कमी फरक आहे. हे जगातील इतर शहरांपेक्षा खूप जास्त असल्याचे काहींनी म्हटलंय.