Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

गोपीनाथ मुंडेंची थोरल्या लेकीबद्दलची 'ती' इच्छा शेवटपर्यंत अपूर्णच राहिली

महाराष्ट्राचे 'लोकनेता' गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. 

गोपीनाथ मुंडेंची थोरल्या लेकीबद्दलची 'ती' इच्छा शेवटपर्यंत अपूर्णच राहिली

Gopinath Munde Death Anniversary: महाराष्ट्रातल्या राजकारणातील प्रभावी व्यक्तीमत्त्व म्हणून गोपीनाथ मुंडे यांची ओळख आहे. घरातून कोणताही राजकीय वारसा नसताना गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर लोकनेता पदापर्यंत झेप घेतली. आज गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी. 3 जून रोजी 2014 रोजी गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं. 

यांच्या निधनानंतर आज त्यांच्या तीन मुली पंकजा पालवे-मुंडे, प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे या तीन मुली आहेत. गोपीनाथ मुंडेंचा वारसा आज या तिन्ही मुली सांभाळत आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात या तिघींनी राजकारणातील आपला वारसा जपला. 

गोपीनाथ मुंडे यांची आपल्या थोरल्या लेकीबद्दल एक इच्छा होती. जी इच्छा अपूर्णच राहिली आहे. ती इच्छा कोणती? गोपीनाथ मुंडे यांना तीन मुली असून या मुलींनी आपल्या वडिलांचा राजकारण आणि समाजकारणाचा व्हिडीओ जपला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या तिन्ही मुली उच्च शिक्षित देखील आहेत. अस असताना गोपीनाथ मुंडेंची एक इच्छा मात्र अर्धवट राहिली आहे. 

तिन्ही मुलींचं शिक्षण किती?

यक्षश्री मुंडे 
यक्षश्री मुंडे या गोपीनाथ मुंडे आणि प्रज्ञा मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या आहेत. यशश्री यांनी कायद्याच शिक्षण घतेल आहे. त्या पदव्युत्तर पदवीचे (LLM) शिक्षण घेतले आहे. कायद्याच्याअभ्यासासाठी जगातील पाच प्रमुख विद्यापीठांपैकी एक असलेल्या कॉर्नेल विद्यापीठात यशश्री मुंडे या पदव्युत्तर पदवीचे(एलएलएम) शिक्षण घेत होत्या. या विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या केवळ ११ टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो. यात यशश्री यांचा नंबर लागला होता. रविवारी कॉर्नेल विद्यापीठात पदवी प्रदान समारंभ पार पडला. या वेळी यशश्री मुंडे यांचा प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट या पुरस्काराने विद्यापीठाने गौरव केला.

प्रीतम मुंडे 
प्रीतम मुंडे यां Dermattologist आहेत.  त्यांनी काही दिवस प्रॅक्टीसही केली आहे. पण कालांतराने त्यांनी आपल्या वडिल आणि बहिणीच्या पाऊलावर पाऊल ठेवत राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. 

पंकजा मुंडे 
पंकजा मुंडे परळी वैजनाथ येथे जन्म झाला. दहावीपर्यंत परळीतील श्री सरस्वती विद्यालयात शालेय शिक्षण घेत पुढे मुंबईच्या जय हिंद महाविद्यालयात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेतलं.1999 मध्ये मुंबईच्या रुईया कॉलेजमधून पंकजा मुंडेंनी विज्ञानात बॅचलर पदवी पूर्ण केली आहे. त्यांनतर त्यांनी MBA चं शिक्षण घेतलं. 

अर्धवट इच्छा कोणती?
पंकजा मुंडे यांनी डॉक्टर व्हावं, MBBS चं शिक्षण घ्यावं अशी गोपीनाथ मुंडे यांची मनापासून इच्छा होती. मात्र पंकजा मुंडे यांनी राजकारणात मात्र गोपीनाथ मुंडे यांचा वारसा जपला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या द्वितीय कन्येने त्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे. 

Read More