Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

GramPanchayat Election Result : जालन्यात रावसाहेब दानवेंना धक्का, भाजपने सत्ता गमावली

 भोकरदन तालुक्यात भाजपला जोरदार हादरा बसलाय. 

GramPanchayat Election Result : जालन्यात रावसाहेब दानवेंना धक्का, भाजपने सत्ता गमावली

जालना : जालना ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल समोर आला असून भोकरदन तालुक्यात भाजपला जोरदार हादरा बसलाय. भाजपच्या ताब्यात असलेली रेणुकाई पिंपळगाव ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीला विजय मिळालाय. या ठिकाणच्या 13 पैकी 12 जागेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विजय मिळवलाय.

पारध, वालसावंगी, सिपोरा बाजार ग्रामपंचायतीत भाजपने सत्ता गमावल्याचे पाहायाला मिळाले. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा जल्लोष सुरु आहे.केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंसाठी हा जोरदार धक्का मानला जातोय.

जालना ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी दरम्यान तहसिल कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळाला. वारंवार सुचना देऊनही हा गोंधळ नियंत्रणाबाहेर चालला होता. त्यामुळे पोलिसांना आपल्या खाकीचा वापर करावा लागला. गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज केला. सूचना देऊनही गोंधळ घालत असल्याने लाठीचार्ज झाला. सध्या या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आहे.

Read More