Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नातवाला पोहायला शिकवताना विहिरीत बुडून आजोबांचा मृत्यू

त्यांच्या निधनामुळे समस्त डोलारे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. 

नातवाला पोहायला शिकवताना विहिरीत बुडून आजोबांचा मृत्यू

सोलापूर: सोलापुरात नातवाला पोहायला शिकवताना एका वृद्धाचा विहिरीत पडून दुर्देवी मृत्यू झाला. सदर ही घटना सोलापूर- बार्शी रोड लगत अजित देशपांडे यांच्या शेतातील बांधीव विहिरीमध्ये घडली. देवदास नामदेव डोलारे  (वय६०) हे आपल्या दहा वर्षाच्या नातवासोबत विहिरीवर पोहोण्यासाठी गेले होते. त्यावेळी पॅन्ट काढत असताना पायात पॅन्ट अडकली. त्यामुळे देवदास डोलारे विहिरीत पडले. मात्र, यावेळी त्यांचे पाय पँटमध्ये अडकून राहिल्याने पोहायला येत असूनही पाण्यात बुडून देवदास डोलारे यांचा मृत्यू झाला. 

त्यांच्या निधनामुळे समस्त डोलारे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. विहिरीला पाणी भरपूर असल्यामुळे आणि दोन्ही पाय पँटमध्ये अडकल्यामुळे त्यांना पाय हलवता न आल्यामुळे डोलारे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. विहीरीतील मृतदेह शोधण्यासाठी वॉटरप्रुफ कॅमेऱ्याची मदत घेण्यात आली आहे. त्यानंतर देवदास नामदेव डोलारे यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.

Read More