Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची ट्रॉलीखाली उडी मारुन आत्महत्या

लग्नाच्या दिवशी नवरदेवानं ट्रॉलीखाली उडी मारुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना साता-यात घडलीय. 

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची ट्रॉलीखाली उडी मारुन आत्महत्या

सातारा : लग्नाच्या दिवशी नवरदेवानं ट्रॉलीखाली उडी मारुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना साता-यात घडलीय. 

गणेश विश्वास बर्गे असं या मृत नवरदेवाचं नाव आहे. गणेशचं कोरेगाव इथल्या शिवरत्न मंगल कार्यालयात विवाह होता. मॉर्निंग वॉकसाठी गणेश गेला होता आणि त्यावेळी त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचं बोललं जात होतं. 

मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिलं असता गणेशने आत्महत्या केल्याचं उघड झालंय. मात्र आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

Read More