Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

‘निकम यांच्या ‘त्या’ फोन कॉलने झालो मंत्री’; ना फडणवीस, ना शिंदे 'या' नेत्याचं नाव घेत गुलाबराव पाटलांचा खुलासा

Gulabrao Patil On How He Got In Cabinet With One Call: ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना राज्यसभेची खासदारकी मिळल्यानंतर त्यांच्या सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमात गुलाबराव पाटील बोलत होते.

‘निकम यांच्या ‘त्या’ फोन कॉलने झालो मंत्री’; ना फडणवीस, ना शिंदे 'या' नेत्याचं नाव घेत गुलाबराव पाटलांचा खुलासा

Gulabrao Patil On How He Got In Cabinet With One Call:  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या गुलाबराव पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांच्याकडे आपण वशिला लावायचा प्रयत्न केला मात्र काम झालं नाही, असं म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी नुकतीच राज्यसभेची खासदारकी मिळालेले ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्या एका फोनमुळे आपण मंत्री झालो, असं आवर्जून नमूद केलं आहे. उज्वल निकम यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाली, त्यांनंतर काल उज्वल निकम यांच्यासाठी आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. 

जिल्ह्याची राजकीय ताकदीचा पाढाच वाचला

"जळगाव जिल्हा हा सगळ्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. राजकीयदृष्ट्या बघितलं तर एक केंद्रीय मंत्री आहे, तीन मंत्री, 11 आमदार, एक विधान परिषद आमदार आहे. उज्वल निकम आणि स्मिता वाघ खासदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात अडचणी असलेल्या प्रश्नांचा सुद्धा लवकर निपटारा होईल," असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. अनेक थोर महान व्यक्तींनी जळगावात वास्तव्य केले. आज येथील उज्जवल निकम खासदार झालेत. पालकमंत्री म्हणून मी त्यांचे अभिनंदन करतो, असं गुलाबराव पाटील म्हणाले. यावेळी गुलाबराव पाटील यांनी यावेळी एक किस्सा आवर्जून सांगितला. 

तो एक फोन फिरवला आणि मी मंत्री झालो

"काही वडील आपल्या मुलांची नाव अशी ठेवतात की त्या नावांमध्ये एक ताकद असते त्यातले एक नाव म्हणजे उज्वल निकम हे त्या वेळेस बाबा सातारकर महाराज म्हटले होते. माझ्या आजही लक्षात आहे की, माझा आणि त्यांचा संबंध आधीचा आहे. सगळे मंत्री झाले होते.  गिरीश महाजन देखील मंत्री झाले होते. मात्र गिरीश भाऊ काही माझा वशिला लावत नव्हते. 2014 साली ज्यावेळी युतीच सरकार आले. त्यावेळेस माझा समावेश होईल असं वाटलं होतं. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंची वर्णी लागली. 2016 मध्ये 2 राज्यमंत्री शिवसेनेकडून घ्यायचे होते. देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजनांकडे विषय टाकला," असं त्यावेळीचा घटनाक्रम सांगताना गुलाबराव पाटलांनी जाहीर भाषणात म्हटलं.

"त्यानंतर मी (गुलाबराव पाटील) जावं कुठे? असा विचार केला. नंतर 'बॉम्ब ब्लास्ट'कडे जाऊया म्हणजे उज्वल निकम साहेब यांच्याकडे गेलो. त्यांचा आणि उद्धव ठाकरे यांचे चांगले संबंध होते. निकम साहेबांनी उद्धव ठाकरेंना फोन लावण्यासाठी सांगितलं.त्यांनी फोन लावला आणि माझा राज्यमंत्री मंडळात समावेश झाला आणि मंत्री झालो," असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

Read More