Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

हनुमान मंदिर नसलेलं महाराष्ट्रातलं एकमेव गाव! 'मारुती' उल्लेख करायलाही इथले लोक घाबरतात, कारण...

Only Village In Maharashtra With No Hanuman Temple: महाराष्ट्रातील या गावामध्ये 'मारुती' अशा शब्दही उच्चारला जात नाही. यामागे एक फारच खास कारण आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात आजच्या हनुमान जंयतीनिमित्त...

हनुमान मंदिर नसलेलं महाराष्ट्रातलं एकमेव गाव! 'मारुती' उल्लेख करायलाही इथले लोक घाबरतात, कारण...

Only Village In Maharashtra With No Hanuman Temple: आज म्हणजेच 12 एप्रिल 2025 रोजी हनुमान जयंती असल्याने देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील हनुमान मंदिरांमध्ये लाडक्या मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. महाराष्ट्रामध्येही अगदी रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुती मंदिरांपासून ते अगदी लहान लहान आकाराच्या मंदिरांबाहेरही भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच गावांमध्ये मारुतीचं एखादं तरी मंदिर असतं, असं म्हटलं जातं. मात्र या दाव्याला आपल्याच राज्यात एक अपवाद ठरणारं गाव आहे.

मारुतीचं नावही घेतलं जात नाही असं गाव आहे तरी कुठं?

महाराष्ट्रातील या गावामध्ये तुम्ही हनुमान चालीसा, मारुतीचं स्रोत्र काहीही म्हणून शकत नाहीत. एवढंच काय तर या गावामध्ये मारुती नावाचा माणूसही नाही. मारुती नावाच्या व्यक्तीला या गावातील कोणी मुलगीही देत नाही. मारुती हा शब्दही या गावात उच्चारणं चुकीचं मानलं जातं. या गावामध्ये मारुती आणि हनुमानाला एवढा विरोध आहे की इथले लोक प्रसिद्ध 'मारुती' कंपनीच्या गाड्याही विकत घेत नाहीत. आता महाराष्ट्रातील हे गाव कोणतं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या गावाचं नाव आहे, महाराष्ट्रातील आहिल्यानगर जिल्ह्यातील दैत्य नांदूर गाव! मात्र या गावामध्ये मारुतीला एवढा मोठा विरोध का केला जातो? यामागील कारणं काय आहेत याची गोष्टीही या गावाइतकी फारच रंजक आहे. चला तर जाणून घेऊयात या विचित्र गावातील सर्वात मोठ्या रहस्यामागील खरं कारण....

यामागील कारण काय?

पोथी-पुराणांमधील कथानकानुसार, निंबादैत्य आणि हनुमानामध्ये एकदा घनघोर गदायुद्ध झालं. या युद्धात दोघेही गंभीर जखमी होतात. जखमी अवस्थेतच निंबादैत्य प्रभू रामाचा धावा करतो. निंबादैत्याने प्रभू रामाचा धावा केल्याने हनुमानही अचंबित होतात. प्रभू राम दर्शन देऊन जखमी निंबादैत्याला बरं करतात. इतकेचं नाही तर ते निंबादैत्याला वर देतात की, या गावामध्ये तुझेच नाव घेतले जाईल. तुझं मंदिरही या गावामध्ये बांधलं जाईल.

यावर निंबादैत्य प्रभू रामाला आठवण करुन देतो की, तुम्ही तर हनुमानाला प्रत्येक गावात तुझं मंदिर होईल असं सांगितलं आहे. तर मग या गावात माझं मंदिर कसं काय शक्य आहे? असा प्रश्न निंबादैत्य विचारतो. त्यावर प्रभू श्रीराम निंबादैत्याला आश्वस्त करतात की, "या गावात तुझेच मंदिर उभं राहील. या गावामध्ये कधीच मारुतीचं मंदिरदेखील उभारलं जाणार नाही. त्याचबरोबर या गावात मारुतीच्या नावाचा उल्लेखही इथं केला जाणार नाही."

नक्की वाचा >> हनुमान जंयतीच्या दिवशीच मधमाशांमुळे भाविकांचा गोंधळ उडालेल्या अंजनेरी पर्वताचं महत्त्व जाणून घ्या

जाणीवपूर्वकपणे मारुतीचं नाव घेतलं तर...

रामायण काळातील ही प्रथा या गावातील लोक आजही 2025 मध्ये सुद्धा जशीच्या तशी पाळत आहेत. निंबादैत्य महाराज हे या गावाचे ग्रामदैवत आहेत. या गावामध्ये जाणीवपूर्वपणे मारुतीचं नाव जरी घेतलं तरी त्याला वाईट आणि विचित्र अनुभव येतात असं येथील गावकऱ्यांचं म्हणणं आहे. 

Read More