Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे ब्रह्मचारी असणा-या हनुमंताचा रथ महिला ओढतात; कारण जाणून थक्का व्हाल

अहिल्यानगरातल्या संगमनेरमध्ये हनुमान मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झालीय. पण इथे हनुमान जयंतीला आगळंवेगळं महत्त्व आहे. कारण हनुमान जयंतीला रथ ओढण्याचा मान महिलांना दिला जातो. अत्यंत जुनी अशी ही परंपरा आजही जोपासली जातेय.

महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे ब्रह्मचारी असणा-या हनुमंताचा रथ महिला ओढतात; कारण जाणून थक्का व्हाल

Hanuman Jayanti 2025 : बोला, रामभक्त हनुमान की जय.... हा जयघोष देशभरात घुमला.   हनुमान जयंती निमित्त राज्यातली हनुमान मंदिरं सजली आहेत. भाविकांचीही मोठी गर्दी मंदिरात पाहायला मिळते. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर शहरातही चैतन्याचं आणि भक्तिमय वातावरण आहे. इथं एक अनोखी परंपरा आहे. ब्रह्मचारी असणा-या हनुमंताचा रथ ओढण्याचा मान हनुमान जयंतीला महिलांना दिला जातो. 

ब्रिटीशांनी या रथाला बंदी घातली. मात्र ही बंदी झुगारून शेकडो महिलांनी 1929 साली ही रथयात्रा काढली आणि तेव्हापासून ही परंपरा आजतागायत सुरू आहे.   1929 पासून आजतागायत रथ ओढण्याची परंपरा कायम. ज्याकाळी देशात अस्पृश्यता होती.. पुरूष स्त्री समानता नव्हती, ब्रिटीशांकडून अत्याचार केले जात होते त्या काळापासून संगमनेरच्या महिलांनी आपली ताकद आणि एकजूट दाखवून हा रथ ओढला होता. 

या रथयात्रेदरम्यान पोलिसांनाही विशेष मान असतो. पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यावरच रथ ओढला जातो. कित्येक वर्षांपासून महिला या ठिकाणी रथ ओढतात. लाकडापासून बनवलेल्या या रथाला श्री बजरंगबली विजय रथ म्हणून संबोधलं जातं. राज्यातल्या काही भागात आजही मारूती मंदिरात जायला महिलांना बंदी असताना ही हनुमान रथ ओढण्याची परंपरा अनुकरणीय आहे. 

Read More