Samarth Ramdas Swami Established 11 Maruti (Hanuman) Temples in Maharashtra: आज हनुमान जयंती असून देशभरामध्ये ती मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. पहाटेपासूनच भाविकांनी लाडक्या हनुमंताचे दर्शन घेण्यासाठी मंदिरांबाहेर रांग लावली आहे. महाराष्ट्रामध्ये हनुमान मंदिरं म्हटल्यानंतर स्वामी रामदासांनी स्थापन केलेल्या हनुमान मंदिरांनाही विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात स्वामी रामदासांनी स्थापन केलेली 11 हनुमान मंदिरं कोणी आणि त्यांच्यासंदर्भातील नेमक्या कहाण्या काय आहेत पाहूयात...
मसूर येथे शके १५६७ला समर्थांनी या मारुतीची स्थापना केली. यास महारुद्र हनुमान म्हणतात. शहापूर ते मसूर अंतर सुमारे साडेतान किलोमीटर आहे. ही मूर्ती ५ फूट उंच असून चुन्याने बनविली आहे.
शहापूर कऱ्हाड-मसूर रस्त्यावर कऱ्हाडपासून सुमारे १० कि.मी. अंतरावर शहापूर फाट्यापासून जवळच नदीच्या किनाऱ्यावर ही मूर्ती स्थापिलेली आहे. ही मूर्ती जवळपास ६ फूट उंच आहे. ह्या मारुतीस शहापूरचा चुन्याचा मारुती म्हणतात. या मूर्तीच्या डोक्यावर गोंडा लावलेली टोपी आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे.
माजगांव येथील एका दगडावर कोरलेली मारुतीची मूर्ती प्रसिद्ध आहे.
शिंगणवाडी येथील खडीचा मारुती म्हणून प्रसिद्ध आहे.
चाफळ येथील राम मंदिराच्या मागच्या बाजूला वीर मारुती मूर्ती आहे. चाफळ येथे दोन मूर्ती आहेत. या गावी शके १५७० मध्ये मारुतीची मूर्ती रामदासांनी स्थापन केली याची तेथे नोंद आहे. श्रीराम मंदिराच्या मागच्या बाजूला असणारी ही मारुती ची मूर्ती वीर मारुती म्हणून ओळखली जाते आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात देखील स्वामी समर्थांनी अनेक मारुती मंदिराची स्थापना केली आहे. या सर्व मारुती देवळांना अकरा मारुती म्हणून ओळखले जाते. त्यामधील मनपाडळेचा मारुती म्हणून प्रसिद्ध असणारे मारुती मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड - जोतिबा परिसरात आहे. वाठार गावापासून 14 किलोमीटर अंतरावर मनपाडळे गाव आहे. 11 मारुती पैकी सर्वात दक्षिण दिशेस असलेल्या या मारुती देऊळाची स्थापना समर्थानी केली आहे. या मारुती मंदिरात 5 फूट उंच हनुमानाची साधी सुबक मूर्ती असून ती उत्तराभिमुखी आहे. मूर्ती जवळ दीडफुटी उंच कुबडी ठेवलेली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या 11 मारुती पैकी पारगावाचा मारुती देखील मोठा प्रसिद्ध आहे. पारगावच्या मारुतीला बाळमारुती किंवा समर्थांच्या झोळीतला मारुती असे देखील म्हणतात. नवे पारगावाजवळ जुने पारगाव आहे त्यात ही मारुतीची मूर्ती आहे. 11 मारुतींपैकी शेवटची आणि सर्वात लहान अशी ही मूर्ती सपाट दगडवर कोरलेली दीड फुटीची मूर्ती आहे. शेंदूर नसून केसांची शेंडी बांधलेली दिसते. मारुतीराया जणू डावीकडे धावत निघाल्याचा आविर्भावात ही मूर्ती कोरलेली आहे. 1654 साली या मारूतीची स्थापना झाली असून रामदास स्वामीनी या मारूतीची स्थापना केली आहेत असं ग्रामस्थ सांगतात. इतकंच न्हवे तर याच ठिकाणी रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची भेट झाल्याचे देखील पुजाऱ्यांचा दावा आहे
वारणेच्या खोऱ्यात असलेल्या मनपाडळे गावाच्या जवळच पाडळी गावात मारुतीची मूर्ती आहे.
समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुती मंदिरांपैकी बहे येथील रामलिंग बेटावरील मारुती मंदिर. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे येथील श्री क्षेत्र रामलिंग बेटावर समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुती मंदिरांपैकी एक मारुती मंदिर आहे.येथे चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या श्रद्धेने पार पडला जातो. प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झालेले श्री क्षेत्र रामलिंग बेट हे प्राचीन तीर्थक्षेत्र! समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुती मंदिरांपैकी एक मारुती मंदिर याच बेटावर आहे. सांगली, सातारा जिल्ह्याला वरदान ठरलेली जीवनदायिनी कृष्णामाईच्या तीरावर बहे गावच्या पश्चिमेस असणारे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून रामलिंग बेटाचा उल्लेख रामायण काळापासून केला जातो. या गावाला येथील रामलिंग बेटामुळे प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. इस्लामपूर पासून 10 कि.मी. व कृष्णा कारखान्यापासून सुमारे 7 कि. मी.अंतरावर कृष्णेच्या तीरावर हे बेट वसलेले आहे. रामलिंग बेटावरील मारुतीच्या स्थापनेविषयी आख्यायिका सांगितल्या जातात. एका कथेचा उल्लेख सापडतो. एक आख्यायिका अशी,प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रामलिंग बेटावर समर्थ रामदास एकदा या तीर्थाच्या दर्शनासाठी आले. प्रभू श्रीराम,लक्ष्मणाचे दर्शन त्यांना झाले. पण हनुमान कुठे दिसेनात,तेव्हा समर्थांनी गावकऱ्यांना विचारले,"येथे मारुती का नाही?" तेव्हा गावकऱ्यांनी सांगितले, "यवनांच्या भयास्तव मारुतीची मूर्ती आमच्या पूर्वजांनी भीमकुंडात टाकली आहे. "तेव्हा समर्थांनी हाक दिली,याविषयी समर्थांनी एका अष्टकात म्हटले आहे
हनुमंत पाहावयालागी आलो,दिसेना सखा थोर विस्मीत जालो। तयावीण देवालये ती उदासे,जळातूनी बोभाइला दास दासे ।।
त्यानंतर समर्थांनी गावकऱ्यांना 11 खंडीचा नैवेद्य तयार करावयास सांगितले व डोहात बुडी मारून मारुतीची 11 गज उंचीची सुवर्णमूर्ती वर काढली. ते 11 प्रहर आत होते. मूर्ती पाण्यातून वर आणल्यानंतर मूर्तीला दाखवण्यासाठी गावकऱ्यांनी 11 खंडीचा नैवेद्य तयार केला न्हवता.मारुती ताटकळणार कसे? म्हणून ते गुप्त झाले. पुढे मारुतीचे दैवी रूप आठवून समर्थांनी डोहात बुडी मारून तिथून मारुतीची मूर्ती बाहेर काढली आणि बहे इथे रामलिंग बेटावर तिची स्थापना केली. हा मारुती रामलिंग मंदिराच्या मागील बाजूस आहे. यालाच भव्य मारुती किंवा विक्राळ मारुती असेही म्हणतात. ही मूर्ती भीमरूपी असून फार सुंदर आहे. रेखीय अवयव,तेजस्वी व सुहास्य वदन,समर्थांनी स्थापन केलेल्या 11 मारुतींपैकी हा मारुती सर्वात मोठा व भव्य मारुती आहे असे म्हटले जाते.समर्थांना मारुतीचे प्रत्यक्ष दर्शन बहे येथे घडले म्हणून त्यांनी 1 भीमरूपी स्तोत्र या स्थानास अनुकूलन केले आहे
अनेक थोर संत,महात्मे,वारकरी व अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या बेटाचा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची कल्पना आ.जयंत पाटील यांच्या दूरदृष्टीतून साकारली आणि आज या बेटाचे स्वरूप बदलले आहे.मंदिर परिसर,तटबंदी,मुख्य दरवाजा,पुजारी निवास,अंतर्गत रस्ते,बागबगीचा,नदी पात्रातील रस्ता अशी पर्यटनासाठी आवश्यक असलेली कामे लोकांच्या आग्रहास्तव राज्य शासनामार्फत पूर्ण झालेली आहेत.काही नियोजित कामे लवकरच मार्गस्थ होणार आहेत.
उंब्रज कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या उंब्रज (सातारा) येथे शके १५७१ मध्ये स्थापिलेली मूर्ती आहे. ही चुना वाळू व ताग यापासून बनविलेली आहे.