Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोट्यवधीच्या झाडाला 24 तास सुरक्षा

काही वर्षांपूर्वी या दुर्मिळ झाडाची चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, त्यामुळे या झाडासाठी चोख सुरक्षा असते

कधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोट्यवधीच्या झाडाला 24 तास सुरक्षा

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : 100 कोटी या आकड्यानं गेल्या काही दिवसांपासून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. राजकारण आणि बॉलिवूडमध्ये 100 कोटी हा परवलीचा शब्द बनलाय. कोकणातही सध्या 100 कोटींची चर्चा रंगली आहे. पण ही चर्चा आहे एका झाडाची. कोकणात एक असं झाड आह ज्याची किंमत तब्बल 100 कोटीच्या घरात आहे.

रत्नागिरीतल्या संगमेश्वर तालुक्यात चाफवली गावाच्या देवराईत हे डेरेदार झाड उभं आहे. तब्बल दीडशे वर्षांपूर्वीचं हे झाड आहे रक्तचंदनाचं. महत्त्वाचं म्हणजे कर्नाटक आणि तामिळनाडूमधल्या विशिष्ट भागांतच हे झाड आढळून येतं. असं असताना कोकणच्या जंगलात हे झाड कसं आलं याचं उत्तर मात्र अजूनही सापडलेलं नाही. 

या झाडाच्या सुरक्षेसाठी गावकरी आणि वनविभागही 24 तास अलर्ट असतो. काही वर्षांपूर्वी हे झाड चोरण्याचाही प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या अतिदुर्मिळ झाडासाठी चोख सुरक्षा आहे. 

रक्तचंदनाला आंतरराष्ट्रीय बाजारात अतिशय महत्त्व आहे. बाजारामध्ये जवळपास 5 ते सहा हजार रूपये किलो दरानं रक्तचंदनाची विक्री होते. आंतरराष्ट्रीय बाजारात विशेषतः चीनमध्ये रक्तचंदनाला मोठी मागणी आहे. उंची दारू, आयुर्वेदिक औषधं, मूर्तींसाठी रक्तचंदनाचा वापर होतो. त्यामुळेच या झाडाची तब्बल शंभर कोटी किंमत आहे. 

Read More